Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips: बॉयफ्रेंडचं असं वागणं म्हणजे ब्रेकअपचे संकेत; तुटण्याआधी वाचवा नातं

Ruchika Jadhav

प्रेमात पडलेल्या दोन्ही व्यक्ती सुरुवातीला एकमेकांची फार काळजी घेतात. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण असते. दोघेही सतत भेटतात गप्पा करतात मात्र नंतर या सर्व गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात. पार्टनर आपल्या जोडीदाराच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी समजल्यावर दोघेही सतत वाईट गोष्टींचाच विचार करतात.

त्यामुळे नात्यातील वाद वाढतात. दोघांनाही सतत एकमेकांबद्दल अविश्वास वाटतो. त्यानंतर एकमेकांविषयी असलेली आपुलकी कमी होते, चिडचिड वाढते आणि दोघेही एकमेकांपासून लांब जाण्याचा निर्णय घेतात. आता तुम्हाला तुमचं नातं तोडायचं नसेल मात्र पार्टनरला तुमच्यापासून दूर जावं वाटतं असेल आणि तो काही दिवसांत ब्रेकअप करणार असेल तर त्याचे काही संकेत तुम्हाला आधीपासूनच मिळतील. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

बोलणं कमी करणे

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याचंही आपल्यावर तितकंच प्रेम असणे गरजेचं असतं. मात्र काहीवेळ नात्यात दुरावा येतो. झालेल्या भांडणांमुळे पार्टनर संवाद साधत नाही. बोलणं टाळतो, अशावेळी त्याच्या मनात आपल्याविषयीच्या निगेटीव्ह भावना वाढत जातात. तुमच्या बॉयफ्रेंडने देखील बोलणं कमी केलं असेल तर तुमचं नातं तुटण्याच्या वाटेवर आहे असं समजा.

बोलण्यात बदल

अनेकदा मुलं कुटुंबातील व्यक्तींच्या दबावात येतात आणि आपल्या प्रेयसीला सोडून देतात. वाद तसेच प्रेमात यश मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड काही मुलांना नकोशी वाटते त्यामुळे ते मु्द्दामुन भांडण करतात. यासह अनेक कारणांमुळे मुलं किंवा मुली ब्रेकअप करण्यासाठी आपल्या पार्टनरशी बोलण्याची पद्धत बदलतात.

भेटत नाहीत

प्रेमात पडताना सुरुवातीच्या दिवसांत दोघंही एकमेकांना सतत आणि वारंवार भेटतात. एकमेकांना जास्त वेळ देतात. मात्र जर तुमचा पार्टनर तुम्हाला भेटण्यास कंटाळा करत असेल तर तो तुमच्यापासून दूर जात आहे. वेळ असूनही भेटण्यास नकार देणं म्हणजे तुमचं नातं संपण्याच्या वाटेवर आहे.

सतत चुका काढणे

ब्रेकअपच्या आधी पार्टनर सतत आपल्या चुका काढतो. तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागत आहात असं सांगितलं जातं. पार्टनरचं असं वागणं म्हणजे तुमचं नातं तुटण्याच्या वाटेवर आहे. तुमच्या नात्यात देखील अशा गोष्टी घडत असतील तर वेळीच सावध व्हा.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT