Brain Strok Warning google
लाईफस्टाईल

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

Brain tumour symptoms : सततची डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात अडचण आणि वर्तनातील बदल ही ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Namdeo Kumbhar

Brain cancer symptoms, causes of persistent headaches : ब्रेन ट्युमर अनेकदा गंभीर होईपर्यंत लक्षात येत नाही. पण आपले शरीर सुरुवातीच्या काळातच ब्रेन ट्युमरचे संकेत देते, त्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. त्याची मोठी किंमत मोजावी लागते. सततची डोकेदुखी, कारण नसताना होणारी उलटी, सारखं अस्वस्थ वाटणं याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. या फक्त सामान्य गोष्टी नाहीत, तर त्या मेंदूच्या एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. गाठ कोणतीही लक्षणे न दाखवता वाढू शकते आणि मेंदूच्या महत्त्वाच्या भागांवर दाब टाकू शकते. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचारांसाठी मेंदूतील गाठीची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Brain Tumour Warning: 6 Early Symptoms You Should Never Ignore)

सुरुवातीला मेंदूत होणाऱ्या या गाठी अत्यंत लहान असल्याने कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण जसजसा या गाठींचा आकार वाढू लागतो तसतसा मेंदूच्या महत्त्वाच्या भागांवर दाब पडतो आणि लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे गाठीचे स्थान, तिचा आकार आणि वाढीचा वेग यावर अवलंबून असतात. त्यामुळे लक्षणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. बीएमजे जर्नलमध्ये काही लक्षणांचा उल्लेख करण्यात आलाय, त्याबाबत जाणून घेऊयात...

ब्रेन ट्यूमरमुळे होणारी डोकेदुखी ठराविक कालांतराने अधिक वारंवार आणि तीव्र होत जाते. ती अनेकदा वेदनाशामक औषधांनी बरी होत नाही. सकाळी उठल्यावर अधिक त्रासदायक वाटू शकते. खोकताना, शिंकताना किंवा वाकताना वाढणाऱ्या, सततच्या दाबामुळे होणाऱ्या वेदनेसारखी ती जाणवू शकते.

  • मळमळ आणि उलट्या

डोकेदुखीसह सतत मळमळ आणि उलट्या होणे, हे डोक्यातील दाब वाढल्याचे सुरुवातीचे लक्षण आहे. ही लक्षणे कालांतराने अधिक गंभीर होऊ शकतात. सकाळी किंवा अचानक हालचाल केल्यानंतर ही लक्षणं दिसतात. त्यामुळे मूळ कारण शोधण्यासाठी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • वर्तनातील बदल

अचानक व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो. मनःस्थितीत सारखा बदल होतो. चिडचिडेपणा वाढतो. काही लोकांना कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय नैराश्य किंवा चिंता जाणवू शकते, ही ब्रेन ट्युमरची लक्षणे असू शकतात.

स्मरणशक्ती कमकुवत होणं.. स्पष्ट विचार करता येत नाही. एखादी माहिती आठवणे, निर्णय घेणे किंवा लक्ष केंद्रित करणे कठीण जातं..

बोलण्यातील समस्या

योग्य शब्द शोधणे, अस्पष्ट बोलणे किंवा भाषा समजण्यात अडचण येणे, हे ट्यूमर संवादासाठी जबाबदार असलेल्या भागांवर परिणाम करत असल्याचे संकेत असू शकतात.

  • सतत वाढणारी डोकेदुखी

  • सकाळची मळमळ किंवा उलट्या

  • गोंधळ किंवा थकव्याचे प्रसंग

  • चालणे किंवा बोलताना, आठवताना अडथळा

  • हात, पाय किंवा चेहऱ्यामध्ये अशक्तपणा किंवा बधिरता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? समुद्रात दडलंय रहस्य

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई, केनियाच्या नागरिकाला अटक; नेमकं कारण काय?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं ६००० रुपयांनी झालं स्वस्त, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT