BP And Cholesterol google
लाईफस्टाईल

BP And Cholesterol : BP आणि कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी आत्ताच नाश्त्यात करा हा १ बदल; लगेचच मिळेल आराम, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Blood Pressure Control Breakfast: बीपी आणि कोलेस्टेरॉल रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात बिस्किटांऐवजी केळी किंवा फळ खाल्ल्यास शरीराला अधिक पोषण मिळते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सोशल मीडियावर कितीतरी सुंदर हॉटेल्सच्या रिल्स पाहायला मिळतात. तिथे अनेकदा ऑफरमध्ये तुम्हाला जेवणाच्या सुविधा मिळतात. पण हेच बाहेरचं स्वस्त वाटणारं अन्न तुमच्याशरीरासाठी आवश्यक आहे का? याचा अनेकदा लोक विचार करत नाहीत. कोणाच्या वाढदिवसाला, सणावाराला लोक जेवणाच्या कुठे ऑफर मिळतायेत का? हे पाहून जेवायला जातात. पण तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कमी वयातच म्हणजेच ३० ते ४० वयातच अनेकांना हार्टच्या संबंधित जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

फक्त खाण्यानेच नाही तर तुमच्या इतर चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला त्या आजारांवर मात करता येत नाही. त्यात तुम्ही BP किंवा कोलेस्ट्रॉलचे रुग्ण असाल तर तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागते. कारण या आजाराची पातळी कधी वाढेल आणि कधी पुर्णपणे कमी होईल, याची लक्षणं फारशी ओळखता येत नाहीत. अनेकजण या आजाराची औषधं घेतात पण त्यांना फारसा आराम जाणवत नाही.

मुळात फक्त गोळ्या- औषधं खाऊन कोणत्याच समस्या सुटत नाहीत. तर त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. डॉक्टरांच्या मते, तुम्ही जर सकाळी ११ वाजता तुमच्या आहारात १ छोटा आणि प्रभावी बदल केला तर तुम्हाला हाय ब्लडच्या आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. पुढे सोप्या पद्धतीत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

रोज सकाळच्या नाश्त्यात म्हणजेच ११ वाजता तुम्ही बिस्किटांऐवजी फळ खावीत. डॉक्टरांच्या मते, फळं खाल्ल्याने शरीराला जास्त पोषण मिळतं. कारण बिस्किटांमध्ये पोषणमूल्य कमी असतं. ती रक्तातील साखर अचानक वाढू शकते आणि लगेचच परत भूक लागू शकते. त्यामुळे केळी खावीत. कारण केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं. त्याने शरीराला लगेचच ऊर्जा मिळते. तसेच केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचं कार्य सुरळीत होतं.

ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आणखी प्रभावी उपाय

१. नियमित 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा.

२. पुरेशी 8 ते 9 तास झोप घ्या.

३. धूम्रपान पुर्णपणे टाळा.

४. जेवणात मीठाचं प्रमाण कमी ठेवा.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT