blood pressure mistakes google
लाईफस्टाईल

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

BP Measurement Mistakes: ब्लड प्रेशर तपासताना होणाऱ्या सामान्य चुका टाळा. चुकीची कफ साइज, चुकीची पोझिशन आणि सवयीमुळे रीडिंग बदलते. डॉक्टरांनी दिलेल्या योग्य पद्धतीने BP तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच काही गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय. कामाच्या धावपळीतून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे या समस्यांना सामोरं जावं लागतंय. आता उन्हाचेही तापमान वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. त्याने सर्वांनाच थकवा, चक्कर, जास्त घाम येणे अशा समस्या जाणवायला लागल्यात.

त्यात जर तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर, हृदयरोग, स्ट्रोक आणि किडनी फेल्युअरसारख्या गंभीर आजारांना तुम्हाला कोणत्याही वयात सामोरं जावं लागू शकतं. अशावेळेस तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल करणे महत्वाचे ठरु शकते.

सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे रक्तदाब मोजताना चुकीच्या आकाराचा कफ वापरणं थांबवलं पाहिजे. कारण त्याचा आकार लहान असल्यास तुम्हाला रीडिंगचा अंदाज घेता येत नाही. डॉक्टरांच्या मते, कपड्यांवरून कफ बांधल्यामुळे 5 ते 50 पॉइंट्सपर्यंत फरक पडू शकतो. तसेच BP तपासताना फोनवर बोलणं किंवा बोलंणं तुम्ही टाळलं पाहिजे. कारण रीडिंग 10 ते 15 mm Hg ने वाढू शकतं. त्यामुळे BP तपासताना शांत बसा आणि कोणत्याही व्यत्ययापासून दूर राहा.

रक्तदाब तपासण्याआधी लघवीला तुम्ही जाऊन या. जर तुमचा मूत्राशय भरलेला असेल तर 'फाइट ऑर फ्लाइट' प्रतिक्रिया सक्रिय होते. म्हणजे तुमच्या हृदयाची हार्ट बीट वाढते आणि रक्तदाब तात्पुरता वाढतो. यामुळे रीडिंग 10 ते 15 mm Hg ने वाढू शकते. तसेच हाताची चुकीची पोझिशनही यावर परिणाम करते. हात खूप वर किंवा खाली असेल तर रीडिंग चुकीचं येतं आणि 10 mm Hg चा फरक पडू शकतो. ही काळजी घेऊन तुम्ही रक्तदाब तपासू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT