Name Astrology
Name Astrology  Saam tv
लाईफस्टाईल

Name Astrology : पैशांच्या बाबतीत या ४ अक्षरांच्या नावाची लोक असतात भाग्यवान, तुमच्या नावाचं अक्षर यात आहे का?

कोमल दामुद्रे

People With Letter Names:

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्याचे नाव, भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आपल्याला जाणून घेता येते. राशीनुसार प्रत्येकाच्या नावाचे भाग्य वेगळे असते.

व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशीवरुन ठेवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठेवले जाते. ग्रहांच्या प्रभावाच्या आधारावर नाव निवडले जाते. यासाठी नावाचे पहिले अक्षर देखील महत्त्वाचे खूप मानले जाते. या ४ अक्षरांच्या नावाची लोक आर्थिकदृष्टीने संपन्न असतात. यांना कधीच पैशांची कमरता भासत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुमचे नाव A, R,S आणि V अक्षरावरुन सुरु होत असेल तर या व्यक्ती अतिशय भाग्यवान असतात. करिअरमध्ये यांना यश लवकर मिळते. प्रेमामध्ये बरेचदा अपयश येते. तसेच या व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व आणि लव लाइफ कसे असेल जाणून घेऊया.

1. A अक्षराने सुरु होणारी नावे

या अक्षरापासून नाव सुरु होणारे लोक स्वभावाने मेहनती आणि प्रामाणिक असतात. त्यांना वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक (Money) नफा मिळतो. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आर्थिक क्षेत्रात ही व्यक्ती भाग्यवान मानली जाते.

2. R अक्षराने सुरु होणारी नावे

ज्या लोकांचे नाव R या अक्षरापासून सुरु होते ते बौद्धिकदृष्ट्या हुशार असतात. त्यांचा स्वभाव मेहनती असतो. या व्यक्तींकडे पैशांची कमतरता नसते. तसेच नशिबाची देखील साथ मिळते. पैशांचा जोरावर काहीही करु शकतात.

3. S अक्षराने सुरु होणारी नावे

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव S अक्षराने सुरु होते.त्यांना सहज यश (Success) मिळते. अनेक आव्हांना सामोरे जावे लागते. पण त्या आव्हानाचा धैर्याने सामना करतात. हे लोक खूप हुशार असतात. कठोर परिश्रम करण्यास कमी पडत नाही.

4. V अक्षराने सुरु होणारी नावे

ज्या लोकांचे नाव V अक्षराने सुरु होते ते मनाने अधिक तीक्ष्ण असतात. त्यांना लवकर यश मिळते. परंतु, प्रेमात नेहमी अपयशी ठरतात. ठरवलेले काम व्यवस्थितरित्या मार्गी लावतात. ध्येय साध्य करण्यासाठी सगळे प्रयत्न करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Bhor Mahad ghat road : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...

Delhi Liquor Policy Case : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू

SCROLL FOR NEXT