Milk Adulteration 
लाईफस्टाईल

Milk Adulteration: सावधान, तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ! सणासुदीच्या काळात दुधात सर्रास भेसळ

Milk Adulteration: सणासुदीच्या दिवसात दुधात भेसळ होत असल्याचा प्रकार समोर आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

तुम्ही पित असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही ना.? हा प्रश्न आम्ही का विचारतोय याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल.कारण, अशी एक टोळी सक्रिय आहे जी दुधात भेसळ करतेय. झटपट पैसे कमावण्यासाठी तुमच्या जीवाशी खेळतेय.कोण आहेत हे पुतना मावशी पाहुयात हा रिपोर्ट.

तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ होतेय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही दूध पिणं सोडून द्याल.बघा, कसे हे तुमच्या जीवाशी खेळतायत.दुधाच्या पिशवीतील दूध एका भांड्यामध्ये काढून घेतलं जातं.मग या दुधात पाणी मिसळून दूध भेसळ केली जातेय. हे कित्येक दिवस सुरू होतं. आता एका नीट पाहा, हे कसे दूध भेसळ करतात.

दूधात भेसळ कशी होते?

दुधाच्या सीलबंद पिशव्या आणून दूध एका भांड्यात ओततात

दुधात पाणी आणि दूध पावडर मिसळून दूध वाढवतात

भेसळ केलेलं दूध पुन्हा कंपनीच्या प्रिंट केलेल्या पिशवीत भरून पॅकिंग करतात

यांची ही चलाखी कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीनेच यांनी घरात डेअरी थाटली होती.मात्र, यांचा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि यांचं पितळ उघडं पडलं...अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे यांचा हा गोरखधंदा उघडकीस आलाय.हा सगळा प्रकार मुंबईच्या मालाड पूर्वेकडील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होता.

तुमच्या दुधात भेसळ ?

त्यामुळे ही दुधातली भेसळ कशी ओळखायची हेदेखील पाहुयात.

दुधातली भेसळ कशी ओळखाल?

भेसळ दूधाची चव कडू असते.

जेव्हा तुम्ही हे दूध बोटावर घेऊन चोळाल तर तुम्हाला साबणाप्रमाणे स्पर्श जाणवेल.

तुम्ही हे दूध गरम केले तर या दूधाचा रंग पिवळा होईल.

सणासुदीचे दिवस सुरू असल्याने अनेक लोक गोडधोडाचे पदार्थ बनवतात...त्यामुळे दूधाची खरेदीही मोठ्या प्रमाणात करतात.याचाच फायदा घेत यांनी लोकांच्या जीवाशी खेळून पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला होता.मात्र, गुन्हे शाखेने या प्रकरणी सैदुल दडपेली आणि श्रीनिवासूलू भंडारू या दोघांना अटक केलीय...आणि त्यांच्याकडून 17 हजार रुपयांचे भेसळयुक्त दूध जप्त केलंय.यांच्यावर जरी कारवाई झाली असली तरी असे भामटे अनेक ठिकाणी दुधात भेसळ करतायत.त्यामुळे तुम्ही दूध खरेदी करताना नीट तपासून घ्या...कारण, भेसळयुक्त दूध मुलांसह तुम्हीही प्यायलात तर आजारी पडाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

SCROLL FOR NEXT