TVS Jupiter 125 SmartXonnect Saam Tv
लाईफस्टाईल

Best Mileage Scooter: 'ही' स्मार्ट स्कूटर देते 62 kmpl चा मायलेज, फक्त 9000 रुपयात घरी घेऊन जाण्याची संधी

Satish Kengar

TVS Jupiter 125 SmartXonnect:

तरुणांना डॅशिंग लूक आणि स्पीडी स्कूटर खूपच आवडते. बाजारात अशीच एक स्मार्ट स्कूटर आहे TVS ज्युपिटर. या स्कूटरमध्ये 62 kmpl चा मायलेज मिळतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही स्कूटर सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्कूटरचे शीट मेटल व्हीलचे बेस मॉडेल 73,340 हजार रुपये एक्स-शोरूम आणि टॉप मॉडेल 89,748 हजार रुपये एक्स-शोरूममध्ये ऑफर केले आहे.

या TVS स्कूटरमध्ये 6 लिटरची इंधन टाकी आणि 109.7 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. अलीकडेच कंपनीने आपला नवीन TVS Jupiter 125 Smart Xonnect सादर केला होता. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

9000 रुपये डाउन पेमेंट

तुम्ही 9000 रुपये डाउन पेमेंट देऊन TVS ज्युपिटर खरेदी करू शकता. या कर्ज योजनेत तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी दरमहा 2452 रुपये द्यावे लागतील. डाउन पेमेंट बदलून मासिक हप्ता निश्चित केला जाऊ शकतो. कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्हाला जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी लागेल. TVS ची ही स्कूटर आकर्षक 16 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही स्कूटर 107 किलो वजनासह येते, ज्यामुळे रस्त्यावर अतिवेगात गाडी चालवताना ही नियंत्रण करणे सोपे होते. (Latest Marathi News)

सुरक्षिततेसाठी या स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक आहेत. TVS ज्युपिटरला 7.88 PS पॉवर आणि 8.8 Nm पीक टॉर्क मिळतो. स्टायलिश लूक देण्यासाठी यात ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील आहेत. स्कूटरमध्ये आरामदायक हँडल बार आणि एलईडी हेडलाइट आहे. ही स्कूटर अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मोठ्या हेडलाइटसह येते. यात यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि 21 लीटर अंडरसीट स्टोरेज स्पेस आहे. TVS Jupiter ZX मध्ये डिस्क ब्रेकचा पर्यायही दिला गेला आहे.

यात 124.8 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. ही स्कूटर 8.15 PS ची पॉवर आणि 10.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर आहेत. हे सिंगल सिलेंडर इंजिनसह येते, जे रस्त्यावर हाय पॉवर जनरेट करते. Jupiter 125 SmartXonnect ची एक्स-शोरूम किंमत 96855 रुपये आहे. यामध्ये एलिगंट रेड आणि मॅट कॉपर ब्रॉन्झ असे दोन रंग पर्याय उपलब्ध आहेत. ही TVS स्कूटर 8.15 PS ची पॉवर आणि 10.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT