Hero Electric Scooter Saam tv
लाईफस्टाईल

Hero Electric Scooter : स्वस्तात मस्त! दहा हजारांच्या डाउनपेमेंटमध्ये खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर, EMI हफ्ता किती? वाचा डीटेल्स

Best EV Scooter List : Hero Electric कडे Atria LX आणि Flash LX सारख्या दमदार ईव्ही आहेत.

कोमल दामुद्रे

Best Electric Scooter :

वाढत्या इंधनदरामुळे अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. बदलत्या काळानुसार आणि प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात तसेच चारचाकीसोबत अनेक स्कूटर्स आणि बाइक सुद्धा इलेक्ट्रिक खरेदी करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांसाठी अनेक पर्याय आहेत. पण त्यापैकी एक हीरो इलेक्ट्रिक कंपनीच्या स्कूटर आहेत.

वर्षभरापूर्वी ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी होती. जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्कूटर घरी आणायची असेल तर Hero Electric कडे Atria LX आणि Flash LX सारख्या दमदार ईव्ही आहेत. जर तुम्ही खरेदी करण्याच्या प्लान करत असाल तर १०,००० रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये विकत घेऊ शकता. तसेच यावर किती EMI भरावा लागेल हे देखील जाणून घेऊया.

1. Hero Electric Atria LX डाउनपेमेंट आणि EMI

सध्या Hero Electric Atria LX ची एक्स शोरुमची किंमत ७७,६९० रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी रेंज ८५ किमी पर्यंत आहे तर टॉप स्पीड २५ किमी प्रतीतास आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करत असाल तर १०००० रुपयांच्या डाउनपेमेंटवर तुम्हाला ६७,६९० रुपयांच कर्ज मिळेल. यामध्ये कर्जाचा कालावधी २ वर्षांचा असेल तर व्याज दर ९ टक्क्यांपर्यंत मिळेल. तसेच EMI साठी पुढील २४ महिन्यांसाठी मासिक हफ्ता हा ३,०९२ रुपये भरावा लागेल.

2. Hero Electric Atria Flash LX डाउनपेमेंट आणि EMI

Hero Electric Atria Flash LX ची सध्या एक्स शोरुमची किंमत (Price) ५९,६४० रुपये आहे. या ईव्ही ची बॅटरी रेंज एका चार्जवर ८५ किलोमीटरपर्यंत आहे तर टॉप स्पीड हा २५ किलोमीटर प्रति तासांपर्यंत आहे. जर तुम्ही १०००० रुपयांच्या डाउनपेमेंटवर तुम्हाला ४९,६४० रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये कर्जाचा कालावधी २ वर्षांपर्यंत असल्यास व्याज दर हा ९ टक्के असेल तर मासिक हफ्ता हा २२६८ रुपयांपर्यंत भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT