Benefits of cardamom, cardamom benefits in Marathi, cardamom Health benefits in Marathi, Benefits of cardamom for health
Benefits of cardamom, cardamom benefits in Marathi, cardamom Health benefits in Marathi, Benefits of cardamom for health ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मसाल्याच्या राणीचा आरोग्यासाठी असाही फायदा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिसायला इवलुशी पण मसाल्यांची राणी म्हणून स्वयंपाकघरात तिचा वावर अनेक वर्षांपासून आहे. पदार्थांची चव वाढविण्यापासून ते त्याच्या सुगंधापर्यंत प्रामुख्याने आपण वेलचीचा वापर करतो. वेलीचीमधे मसाला वेलची आणि हिरवी वेलची असे दोन प्रकार आहेत परंतु, स्वयंपाकघरात (Kitchen) वापरली जाणारी वेलची ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (cardamom benefits in Marathi)

हे देखील पहा -

गोड पदार्थांपासून ते व्हेज-नॉन व्हेजच्या पदार्थांपर्यंत तिच अस्तित्व आहे. खाण्याच्या पाण्यापासून ते तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी वेलचीचा उपयोग होतो. वेलची आरोग्यासाठी कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

वेलची खाल्ल्याने आरोग्यासाठी असा फायदा होतो -

१. सतत दात दुखणे किंवा तोंडाची दुर्गंधी येणे ही खरेतर सामान्य गोष्ट आहे. परंतु, ही समस्या जितकी सामान्य असते तितकीच ती अधिक त्रासदायक आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वेलची आपल्याला मदत करू शकते. वेलची तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि दातांच्या समस्येवर मात करु शकते.

२. वेलची रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वेलचीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

३. सध्याच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, अँसिडीटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या अगदी सामान्य आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी वेलचीचे सेवन करायला हवे.

४.ऋतूमानानुसार हवामानात बदल होत असतात त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, फूड (Food) पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही आपण वेलचीची मदत घेऊ शकतो.

६. तसेच वेलचीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी देखील उपयुक्त असून रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी करण्यास मदत करते

७. वेलचीचा उपयोग पाचनशक्ती सुधारण्यासाठी, अस्वस्थता, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी होतो.

अशाप्रकारे वेलचीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

SCROLL FOR NEXT