Benefits of Paan ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

धार्मिक कार्यात वापरल्या जाणाऱ्या पानाचे फायदे असेही !

आपण कधी पाने चावून खाल्ली आहेत का? नसेल तर एकदा खाऊन बघा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गोड पानापासून ते धार्मिक कार्यापर्यंत विड्याच्या पानाला अधिक महत्त्व आहे. विड्याचं पान अतिशय आवडीनं खाल्लं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये जेवणाची सांगता ही पानाचा विडा खाऊनच होते. खायच्या पानाचे ३०० हून अधिक प्रकार आहेत.

हे देखील पहा -

हल्ली खायचा पानांमध्येही अनेक ट्रेंड (Trend) पाहायला मिळतात स्मोक पान, फायर पान व त्यासोबत असणारे विविध फ्लेवर. अगदी कात-चुना लावून त्याला विविध प्रकारे खाल्ले जाते. तसेच, आपण अनेकदा विड्याची पाने विविध कारणांसाठी वापरतो. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहित असेल की, विड्याचे पान खाल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते.

विड्याची पाने खाण्याचे फायदे-

१. विड्याच्या पानात अँटिऑक्सिडंट, प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने खोकल्याच्या समस्येवरही मात करता येते. तसेच घसाही स्वच्छ (Clean) होतो.

२. पोटाच्या (stomach) विकारासाठी विड्याची पाने खूप चांगली असतात. याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. यासोबतच पोटाशी संबंधित विकारही दूर होतात.

३. विड्याची पाने चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. त्याची पाने चावून तयार केलेला रस तोंडात लपलेले बॅक्टेरिया नष्ट करतो.

४. हिरड्यांमधील वेदना किंवा सूज दूर करण्यासाठी विड्याचे पान देखील फायदेशीर ठरतात. यात असणाऱ्या अनेक गुणधर्मामुळे हिरड्यांमधील जळजळ रोखण्याचे काम करतात.

५.तसेच, विड्याचे पाने अधिक गरम असतात. म्हणूनच याचे सेवन हिवाळ्यात चांगले असते. आपण मर्यादित किंवा कधीतरी उन्हाळ्यात देखील खाऊ शकतो. खाण्याआधी पान नीट धुवावे, जेणेकरून त्यातील धूळ आणि घाण निघून जाईल.

६. आपल्याला गुडघेदुखीची समस्या किंवा पायाला मुक्का मार लागला असेल तर, विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावे व त्या पानाने दुखणाऱ्या जागी शेक घेतल्यास आराम मिळतो

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Shiv Sena Live Update : १९ जुलैला निवडणूक आयोगाकडे कोणता पुरावा होता?; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा आयोगाला थेट सवाल

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी?

SCROLL FOR NEXT