Daily योग: पाठदुखीने त्रस्त आहात? अर्ध कटिचक्रासन नक्की करून पहा Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: पाठदुखीने त्रस्त आहात? अर्ध कटिचक्रासन नक्की करून पहा

अर्ध कटिचक्रासनाचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाठदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. या पाठदुखीची कारणं अनेक असू शकतात. मात्र, यामागे कमकुवत स्नायू आणि लवचिकता कमी असल्याचं महत्त्वाचं कारण आहे. चुकीचे बसणे, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, दीर्घकाळ उभे राहणे यामुळेही पाठदुखीचा, कंबर दुखीचा त्रास होतो. सध्या अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत असल्याने हा त्रास अनेकांना जाणवत असणार. अशा वेळी कामातून थोडा वेळ काढून हे आसन केल्यास त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकेल. Benefits Of Ardhakatichakrasana

अर्ध कटिचक्रासन कसे करावे?

हे आसन करताना शरीराची स्थिती ही अर्ध्या चक्रासारखी होते, म्हणूनच त्याला अर्ध कटिचक्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वांत आधी सरळ सावधान स्थितीत उभे राहा. त्यानंतर उजवा हात सरळ डोक्याच्या वर उचला आणि हळूहळू डावीकडे झुकण्याचा प्रयत्न करा. यावेळी हाताचा कोपरा ताठ आणि हातांची बोटं सरळ ठेवा. गुडघे ताठ ठेवून या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वासोच्छवास करत थोडा वेळ उभे राहा. यानंतर उजवा हात हळूहळू पूर्वस्थितीत आणत खाली करा.

अर्ध कटिचक्रासनाचे फायदे कोणते?

- पाठीचे स्नायू आणि पाठीचा कणा लवचिक होतो.

- फुफ्फुसातील ब्लॉकेज साफ होतात आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते.

- पार्श्वभागाची लवचिकता वाढवते.

- छातीजवळील स्नायूंना योग्य ताण मिळतो.

- मूत्रपिंडाची कार्ये सुधारण्यास मदत होते.

- अतिरिक्त चरबी कमी करून बांधा सुडौल होण्यास मदत मिळते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT