Beetroot Raita Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Beetroot Raita Recipe : बीटाचा रायता आहे आरोग्यासाठी फायदेशीर ! जाणून घ्या, कसा बनवायचा

चवीला हलकी गोड, पण पोषक तत्वांनी परिपूर्ण, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर, बीटची भाजी अनेकदा लोकांना आवडत नाही.

कोमल दामुद्रे

Beetroot Raita Recipe : आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. पण ती नवीन गोष्ट आपल्या आरोग्यासाठी चांगली असेल की नाही हेही मनात राहते. अनेकदा आई-वडील आपल्याला फळे, भाज्या आणि ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

चवीला हलकी गोड, पण पोषक तत्वांनी परिपूर्ण, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर, बीटची भाजी अनेकदा लोकांना आवडत नाही. कोशिंबीर म्हणून खाणे टाळण्याचा प्रयत्न ही केला जातो, पण रायता बनवून त्याचा वापर सहज करता येतो.

बीटरूटच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी बीटरूट खूप फायदेशीर आहे. बीटरूट शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते, त्यामुळे ज्यांना रक्ताची (Blood) कमतरता आहे त्यांनी याचे सेवन जरूर करावे. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

तज्ज्ञांच्या मते, १०० ग्रॅम बीटरूटमध्ये फक्त ४३ कॅलरीज आढळतात. तर जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या बाबतीत सोडियम ७८ मिलीग्राम, पोटॅशियम ३२५ मिलीग्राम, कार्बोहायड्रेट १० ग्रॅम, फायबर २.८ ग्रॅम, साखर ७ ग्रॅम, प्रथिने १.६ ग्रॅम, व्हिटॅमिन सी ८ टक्के, लोह ४ टक्के आणि मॅग्नेशियम ५ टक्के बीटमध्ये आढळते. चला तर मग पाहुयात रेसिपी.

साहित्य -

दही - १ कप, बीट-१, हिरवी मिरची - १-२ चिरलेली, राई - १/२ टीस्पून, कढीपत्ता - ३-४, काळे मीठ - चवीनुसार, भाजलेले जिरे - अर्धा टीस्पून, तेल (Oil) - १ टीस्पून

बीटाचा रायता रेसिपी -

- बीटरूट नीट धुवून स्वच्छ करा आणि किसून घ्या.

- एका भांड्यात दही चांगले फेटा. त्यात किसलेले बीटरूट आणि हिरव्या मिरच्या घाला.

- कढईत तेल टाकून गरम करा. त्यात तीळ, मोहरी आणि कढीपत्ता घालून तळून घ्या.

- थोडं थंड होऊ द्या. दही आणि बीटच्या मिश्रणात घाला आणि मिक्स करा. आता भाजलेले जिरे पूड घाला.

- अतिशय हेल्दी आणि चविष्ट बीटरूट रायता तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT