Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips: ग्लोइंग त्वचा हवी आहे? मात्र 'या' लोकांनी चुकूनही मुलतानी माती चेहऱ्यावर लावू नये

Beauty Tips:चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी प्रत्येकजण अनेक प्रयत्न करत असतो. मात्र तुम्ही मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तजेलदार आणि निरोगी त्वचेसाठी अनेकजण बाजारात मिळणारे अनेक उत्पादने वापरत असतात . तक कधी घरगुती उपाय किंवा स्कीन केयर रुटीनला त्याच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करतात. पंरतू कायम म्हटले जाते की आपल्या त्वचेच्या स्कीन टाईपनुसार आपण ब्यूटी प्रोडक्ट्स वापरायला हवे. जर आपण असे नाही केले तर आपल्या त्वचेला गंभीर नुकसानही होऊ शकतात.

जर त्वचेसाठी काही घरगुती उपाय करायचा असल्यास तो अनेकदा चांगल असतो असा समज प्रत्येकाचा असतो. मात्र आपल्या त्वचेला स्कीन टाईपनुसार तसेच प्रत्येक ऋतूनुसार(season) त्या गोष्टींचा वापर केला नाही तर घरगुती उपायांचे आपल्या चेहऱ्याला नुकसान होते. तर काही लोकांना विशिष्ट गोष्टीची अॅलर्जीही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या त्वचेला सूट होईल अशा गोष्टींचा वापर करावा.

सर्वांत जास्त चेहऱ्यासाठी वापरला जाणारा घरगुती उपाय हा मुलतानी माती असतो. अनेक महिला महिन्यातून अनेकवेळा मुलतानी माती चेहऱ्याला लावत असतात. महिलांच नाही तर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष याचा वापर करतात. मात्र चुकीच्या पद्धतीने मुलतानी मातीचा चेहऱ्यावर वापर केल्यास त्वचेला गंभीर नुकसान पोहचू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या(problem) असल्यास त्या व्यक्तींनी त्याचा वापर करणे टाळा.

संवेदनशील त्वचा

ज्या व्यक्तींची त्वचा जास्त संवेदनशील असते त्या व्यक्तींनी मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यावर करणे टाळावा. जर त्यांनी मुलतानी मातीचा वापर केल्यास चेहऱ्यावर पुरळ किंवा त्वचेवर लाल चट्टे उठण्याची शक्यता असते.

कोरडी त्वचा

नेकांची बऱ्याचदा तक्रा र असते की आमची त्वचा कोरडी आहे. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या निर्माण होतात पंरतू ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनीही मुलतानी मातीचा वापर करु नये. जर मुलतानी मातीचा वापर करायचा असल्यात त्यात मध किंवा बदाम जेल तसेच कोरफडीचा गर तुम्ही मिस्क करु शकता.

दररोज वापर करु नये

अनेकदा काही व्यक्तीचा समज असतो की दररोज मुलतानी(multani-mati) मातीचा वापर केल्यास चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. मात्र मुलतानी मातीचा दररोज वापर केल्यास चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT