लठ्ठपणाने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे सोपे नाही. बऱ्याच वर्षांपासून वजन कमी करण्याच्या इतर विविध पद्धतींचा पाठपुरावा केल्यानंतर हा एक अंतिम पर्याय उरतो.
मुंबईतील नमाहा आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्सचे डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेटाहेल- लॅप्रोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटरचे म्हणतात की, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांना वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करते.
1. लठ्ठपणाबाबत असलेला गैरसमज:
अनेक कुटुंबातील सदस्यांचा असा चुकीचा समज असतो की वजन वाढणे हे केवळ अति खाणे आणि बैठी जीवनशैलीचा परिणाम आहे. सतत त्या व्यक्तीला कमी खाणे (Food) आणि जास्त शारीरिक हालचाल करण्याचा सल्ला देतात.
स्थूलपणाचे स्वरूप समजून घेणे आणि त्याबात पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यात अनुवांशिक, पर्यावरणीय, चयापचय आणि हार्मोनल घटक समाविष्ट आहेत जे पारंपारिक जीवनशैली समायोजनांच्या पलीकडे विस्तारित आहेत. हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की वैद्यकीयदृष्ट्या गंभीर लठ्ठपणाचा उपचार केवळ आहार आणि जीवनशैलीत बदल करुन केला जात शकत नाही. अपुरे उपचार घेतल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास, लठ्ठपणा हा मानवी शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाचे नुकसान करु शकतो.
2. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसंबंधीत गैरसमज
अपुऱ्या जनजागृतीमुळे बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेला अनेकदा 'शॉर्टकट' पर्याय ठरविला जातो. लठ्ठपणावर शस्त्रक्रियेने उपचार करणे अनैसर्गिक असल्याचे लोकांचा गारसमज असुन तो दूर करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेला शॉर्टकट म्हणून न पाहता लठ्ठपणाच्या उपचारांसाठी वैद्यकीयदृष्ट्या वेळीच हस्तक्षेप करण्याचा योग्य पर्याय म्हणून याकडे पाहिले गेले पाहिजे.
3. लठ्ठपणाचे परिणामांबद्दल अपुरे ज्ञान
चयापचय आणि गतिशीलता-संबंधित गुंतागुंतांसह एकूण आरोग्यावर लठ्ठपणाचा गंभीर परिणाम होतो. लठ्ठपणा हा एक प्रगतीशील रोग (Disease) आहे जो मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करतो. पद्धतशीर परिणाम समजून घेऊन वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
4. शस्त्रक्रियेची भीती
गंभीर लठ्ठपणा असलेल्या रूग्णांसाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा सर्वात प्रभावी उपचार पर्यायांपैकी एक आहे. आज बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही इतर कोणत्याही लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेइतकीच सुरक्षित आहे. कुटुंबांना प्री-ऑपरेटिव्ह मूल्यमापन, शस्त्रक्रियेच्या तंत्रातील प्रगती आणि पोस्ट-ऑपरेटिव्ह काळजी तसेच जोखीम कमी करणाऱ्या फॉलो-अप प्रक्रियेविषयी माहिती असणे गरजेचे आहे.बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचे फायदे आणि तोटे नेहमी समजून घेणे गरजेचे आहे.
5. गुंतागुंत होण्याची भीती:
शस्त्रक्रियेनंतरच्या संभाव्य गुंतागुंतांबद्दल काळजी घेणे हे संपुर्ण कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण प्रतिबंधक म्हणून काम करू शकते. उपचारांवर देखरेख करणाऱ्या वैद्यकीय पथकाशी मुक्त आणि पारदर्शक संवाद साधणे अत्यावश्यक आहे. सूक्ष्म तपासणी प्रक्रिया, शस्त्रक्रिया तंत्रातील प्रगती आणि जोखीम कमी करणारी शस्त्रक्रियेनंतरची संपूर्ण काळजी समजून घेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबाबतच्या गैरसमजूती कुटुंबांमध्ये भीती आणि तणाव निर्माण करतात. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या यशस्वी आणि सकारात्मक परिणामांबद्दल माहिती दिल्याने चुकीच्या माहितीचा प्रसार रोखता येऊ शकतो.
6. माहितीची कमतरता:
बऱ्याच वेळा, कुटुंबांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेतील प्रगती, स्क्रीनिंग प्रक्रिया आणि उच्च यश दरांबद्दल पुरेशी माहिती नसते. अचूक आणि अद्ययावत माहितीच्या अभावामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय न घेता येणे.
7. भूतकाळातील नकारात्मक अनुभव:
भूतकाळातील बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांचे नकारात्मक परिणाम किंवा गुंतागुंत देखील कुटुंबातील सदस्यांवर परिणाम करते. वर्षानुवर्षे या क्षेत्रातील अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये वाढली आहेत. अद्ययावत माहितीसह या समस्यांचे निराकरण करणे आणि शस्त्रक्रिया तंत्रातील सुधारणांवर चर्चा करणे फायदेशीर ठरू शकते.
8. आर्थिक चिंता:
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेशी निगडीत आर्थिक परिणामांबद्दलच्या चिंतेमुळे कुटुंबांवर मोठा परिणाम होऊ शकतो. तथापि, संभाव्य दीर्घकालीन आरोग्यास होणारे फायदे लक्षात घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया आता वैद्यकीय विम्यातंर्गत येत असल्याने आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.