Bad Taste In Mouth Due To Fever Saam Tv
लाईफस्टाईल

Bad Taste In Mouth Due To Fever : ताप आल्यामुळे तोंडाची चव बिघडते? हे 5 उपाय करा, टेस्ट येईल परत

Bad Taste In Mouth : ताप असताना किंवा बरे झाल्यानंतरही काही लोकांच्या तोंडाची चव अनेकदा जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bad Taste In Mouth Home Remedies : तुम्ही सर्वांनी कधी ना कधी तोंडाला वाईट चव अनुभवली असेलच. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की दातांची खराब स्वच्छता किंवा तोंडाचा संसर्ग झाल्याने होते. याशिवाय, तोंडाला खराब चव येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे आजार.

ताप असताना किंवा बरे झाल्यानंतरही काही लोकांच्या तोंडाची (Mouth) चव अनेकदा जाते. या काळात काहीही खाताना त्याची चव कळत नाही. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर पाहूयात काही घरगुती उपायांबद्दल ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या तोंडातील खराब चव दूर करू शकता.

तोंडाची खराब चव कशी बरे करावी?

1. ऍपल सायडर व्हिनेगर

  • 1 टीस्पून अॅपल सायडर व्हिनेगर

  • 1 ग्लास कोमट पाणी

एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल (Apple) सायडर व्हिनेगर मिसळा. ते चांगले मिसळा, हवे असल्यास थोडे मध घालून प्या. हे दिवसातून एकदा करणे आवश्यक आहे.

2. बेकिंग सोडा

  • 1 टीस्पून बेकिंग सोडा

  • लिंबाचा रस (काही थेंब)

एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. दात घासण्यासाठी ही पेस्ट वापरा. हे दिवसातून एकदा करा.

3. कोमट पाणी आणि मीठ

  • 1 टीस्पून मीठ

  • 1 ग्लास कोमट पाणी

एका ग्लास कोमट पाण्यात (Water) एक चमचा मीठ घाला. ते चांगले मिसळा आणि तोंडात ठेवून गार्गल करा. हे दररोज 2 ते 3 वेळा करा.

4. हळद आणि लिंबू

  • अर्धा टीस्पून हळद पावडर

  • लिंबाच्या रसाचे काही थेंब

अर्धा चमचा हळद पावडरमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. ही घट्ट पेस्ट तुमच्या जिभेवर आणि तोंडात लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. सुमारे 2 आठवडे दिवसातून एकदा हे करा.

5. लिंबू आणि गरम पाणी

  • 1 लिंबू

  • 1 ग्लास कोमट पाणी

एका ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. हे द्रावण चांगले मिसळा आणि तोंड स्वच्छ धुण्यासाठी वापरा. फायदे पाहण्यासाठी किमान आठवडाभर दिवसातून एकदा असे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Rain : जळगावमध्ये मुसळधार पाऊस, बहुळा धरणाचा रुद्र अवतार | VIDEO

Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Mumbai Pune : मुंबई-पुणे महामार्गावर भयंकर अपघात, २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Sukanya Samruddhi Yojana: मुलींसाठी सरकारची खास योजना! महिन्याला २९१६ रुपये गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

SCROLL FOR NEXT