Bad Habits of Kids Saam TV
लाईफस्टाईल

Bad Habits of Kids : तुमचे मूल वाईट संगतीत आहे ? तर 'या' टिप्सचा वापर करा

आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालक करतात, मात्र इंटरनेटच्या युगात चुकीच्या संगतीचा परिणाम मुलांवर लगेच होतो.

कोमल दामुद्रे

Bad Habits of Kids : आजकाल मुलांचे संगोपन करणे इतके सोपे नाही. पालकांना आपल्या मुलांच्या संगोपनाची काळजी नेहमीच असते. मुलांना चांगले संस्कार मिळावेत असं प्रत्येकाला वाटत असतं.

आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालक करतात, मात्र इंटरनेटच्या युगात चुकीच्या संगतीचा परिणाम मुलांवर (Child) लगेच होतो. आपल्या मुलाला वाईट संगत लागली तर काय करायच? हा प्रश्न पालकांना पडतो. वाईट लोकांच्या संगतीत मुलं न राहणंच हेच पालकांसाठी (Parents) आणि त्या मुलांसाठी महत्वाच असतं.

किशोरवयात मुलांना समजावून सांगणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.जेव्हा मुले किशोरवयात असतात तेव्हा हे आणखी कठीण होते. ही वेळ पालकांसाठी देखील खूप गोंधळात टाकणारी आहे कारण त्यांना काळजी घेणे आणि निरीक्षण करणे यात समतोल साधावा लागतो.

किशोरवयीन मुलांचे पालक हे चांगले समजू शकतात.अनेकवेळा असे घडते की, मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देतो, परंतु काही वेळा ही गोष्ट मुलांच्या बाबतीत खरी ठरत नाही.

बरेच लोक मुलांना दिशाभूल करतात, त्यामुळे मुले चुकीच्या दिशेने जाऊ लागतात. स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलं शिस्त गमावून मनमानी वागू लागतात. जर आपले मूल चुकीच्या संगतीत पडले असेल तर काही मार्ग आहेत जे आपल्याला मदत करू शकतात.

आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचा किंवा आपल्या मित्र परिवाराचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांना देखील मुलांच्या संगतीबाबत प्रश्न असतात.

मुलांशी बोला -

मुलांवर रागावण्याऐवजी मुलांशी निवांतपणे बोला आणि त्याला विचारा की तो असे का करतो आहे? काहीही बोलण्यापूर्वी मुलाचे ऐकले पाहिजे. जेणेकरून मूल न घाबरता सत्य बोलेल.

मुलाला मारणे -

मुलांवर कधी ही हिंसाचार करू नका, असे केल्याने मुले अधिक राग राग करतात आणि ज्या गोष्टीला मनाई कराल त्याच गोष्टी ते करतात. त्यामुळे आपला राग न ठेवता मुलांशी सहज आणि मित्रांप्रमाणे बोलणे.

एक किस्सा सांगा -

हा देखील मुलांशी बोलण्याचा एक मार्ग असू शकतो. आपण त्याला काही वाईट संगतीच्या परिणामांबद्दल एक किस्सा देखील सांगू शकतो. त्यांना सांगा की काळानुसार जग किती वेगाने बदलले आहे, अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी लोकांचे हेतू समजून घेणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून ते योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकतील.

मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा -

अनेकदा घरातल्या वातावरणात मुलांना गुदमरल्यासारखे वाटू लागते. अशा परिस्थितीत बाहेर जाऊन मुलांचे मनोरंजन करणे आणि दर्जेदार वेळ घालवणे. या दरम्यान मुलांच्या मित्रांसारखे बोलणे, मुलांना गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.

मुलांना अ‍ॅक्टिव्हिटी क्लासमध्ये पाठवने -

मुलांची उर्जा योग्य दिशेने वळवू शकता.अभ्यासाव्यतिरिक्त, मुलाला छंद किंवा क्रियाकलाप वर्गात जाण्यास सांगा. यामुळे मुलांचे कौशल्यही सुधारेल आणि मुलांचा वेळ वाया जाणार नाही. त्याला पाहून इतर मित्रही वर्गात सामील होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT