Baby Having Loose Motion While Teething Saam Tv
लाईफस्टाईल

Baby Having Loose Motion While Teething : बाळांना दात येण्याच्या काळात का होतात जुलाब? जाणून घ्या यामागचे योग्य कारण

Loose Motion While Teething : बाळाला दात येणे ही त्याच्या आयुष्यातली पहिली मोठी घटना असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baby Care : बाळाला दात येणे ही त्याच्या आयुष्यातली पहिली मोठी घटना असते, पण हि प्रक्रिया बाळासाठी एक त्रास सुद्धा घेऊन येते. तो त्रास असतो अतिसाराचा! बाळाला दात येण्यासोबतच हा त्रास सुरु होतो आणि हा त्रास इतका बाळासाठी असह्य असतो की हसणारं, खेळणारं बाळ खूप रडतं आणि केवळ निपचित पडून राहतं. त्याची ती अवस्था कधी कधी बघवतही नाही.

तुम्ही सुद्धा बाळाला (Baby) होणारा हा त्रास स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला असेलच. पण काय आहे यामागचं कारण? दात येताना बाळाला का अतिसाराचा त्रास सुरु होतो? बरेच जण या मागे काहीही तर्क वितर्क लावतात. पण यामागचं नेमकं कारण फारच कमी जणांना माहित आहे.

दात येताना अतिसार का होतो?

हा गोंधळ वर्षानुवर्षे सुरू आहे, पण वैद्यकीय संशोधनात दात आणि जुलाबाचा संबंध दूरवर आढळून आला नाही. तथापि, दात येताना मुलांना जुलाब होतो हे नाकारता येत नाही. पण यामागे इतरही अनेक घटक कारणीभूत असू शकतात.

जेव्हा बाळाला दात (Teeth) येणार असतात, तेव्हा बहुतेकदा बाळाच्या हिरड्या खूप कडक होतात, ज्यामुळे त्यांच्यात चिडचिड होते, म्हणूनच मुले तोंडात हात ठेवून त्यांच्या हाताला चावतात तसेच आजू-बाजूच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात.

अशा परिस्थितीत त्या गोष्टींमध्ये स्वच्छता नसेल तर पोटात (Stomach) संसर्ग होऊ शकतो. तरीही मुलं खूप संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यात जास्त संसर्ग होतो आणि या गोष्टींमुळे मुलांमध्ये लूज मोशन होते. याशिवाय दात येताना मुलाच्या शरीराचे तापमानही वाढते. यासोबतच लाळही जास्त येऊ लागते.

या कारणांमुळे अतिसार देखील होतो -

1. मुलांना लूज मोशन आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. जेव्हा मूल अंगावरून दूध पितात आणि दूध पचत नाही तेव्हा असे होते. यामुळे लूज मोशन देखील होऊ शकते.

2. कधीकधी आपण मुलांना गायीचे दूध देतो. पण मुलांनाही गायीच्या दुधाची अॅलर्जी होते. त्यामुळे उलट्या आणि लूज मोशन देखील होऊ शकतात.

3. लूज मोशनचे कारण पोटाचे संक्रमण देखील असू शकते. अनेक वेळा दुधाची बाटली स्वच्छ नसल्यामुळे बाटलीतील बॅक्टेरिया थेट बाळाच्या पोटात जातात आणि त्यामुळे लूज मोशनही होऊ शकते.

अतिसार कसा टाळावा?

जर तुम्हाला जुलाबापासून मुलाला वाचवायचे असेल तर तुमच्या मुलाच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी स्वच्छ असायला हव्यात हे ध्यानात ठेवावे. तुमच्या मुलाने काहीही उचलून तोंडात घेऊ नये. यासोबतच शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.वरील दूध पिण्याऐवजी आईने थोड्या वेळाने स्वतःला पाजावे.जास्त त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT