Baby Girl Name Saam TV
लाईफस्टाईल

Baby Girl Name: गणेशोत्सवात घरी मुलीचा जन्म झाला? मग बाप्पाची आठवण कायम राहण्यासाठी ठेवा 'ही' नावे

Baby Girl Name List: गणेशोत्सवात तुमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे? मग गणरायाच्या नावाने ठेवा मुलीचं नाव.

Ruchika Jadhav

7 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरी बाप्पा आल्याने प्रत्येक व्यक्ती त्याच्या सेवेत मग्न आहे. अशात काही घरांमध्ये लहान मुलांचा जन्म सुद्धा झाला आहे. आता तुमच्या घरी देखील चिमुकल्या मुलीने जन्म घेतला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही मुलींच्या नावाची लिस्ट आणली आहे.

गणेशोत्सवात बाप्पाने आपल्या घरी मुलगी पाठवली म्हणजे ती आपल्या कुटुंबासाठी फार भाग्यवान असणार असा विचार प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती करतात. त्यामुळेच आपल्या मुलीचं नाव तुम्ही बाप्पाच्या नावाशी आणि आठवणींशी जोडलेलं ठेवू शकता.

आर्विका

आर्विका हे नाव गणपती बाप्पाशी जोडलेलं आहे. आर्विका म्हणजे कायम आपल्या बरोबर असलेली व्यक्ती.

शुभाई

शुभाई हे नाव सुद्धा फार सुंदर आहे. घरी गणराया असणे म्हणजे हा शुभ काळ आहे. या काळात मुलीने जन्म घेतल्याने तुम्ही तिचे नाव शुभाई ठेवू शकता.

गानवी

गणपती बाप्पा म्हणजे विद्येची देवी. काही घरांमध्ये आधीपासून संगीताचा वारसा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं नाव गानवी सुद्धा ठेवू शकता.

कृतीनी

कृतीनी हे नाव हिंदू धर्मात फार शुभ मानले जाते. या नावाचा अर्थ म्हणजे अशी मुलगी जी प्रत्येक कार्यात योग्य आणि परिपूर्ण आहे. या नावाच्या मुली आपल्या जीवनात नेहमी सक्सेसफुल होतात.

चिन्मयी

गणरायाला चिन्मय या नावाने सुद्धा ओळखलं जाते. त्यामुळे तुमच्या लाडक्या मुलीचं नाव तुम्ही चिन्मयी सुद्धा ठेवू शकता. या नावाच्या मुलींवर बाप्पाची कृपादृष्टी असते.

सिद्धिदा

गणपती बाप्पाच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांमपैकी सिद्धिदा हे नाव सिद्धी नावाशी जोडलेलं आहे.

इहिका

इहिका हे नाव सुद्धा गणरायाच्या तकतीशी जोडलेलं आहे. इहिका म्हणजे बलवान आणि अशी व्यक्ती जी वाईट प्रवृत्तीचा नाश करते.

गन्वी

गणपती बाप्पाच्या नावावरून तुम्ही तुमच्या मुलीचं नाव गन्वी सुद्धा ठेवू शकता. हे अतिशय युनिक नाव आहे.

निर्विघ्ना

गणरायाला सर्व दु:खाचा आणि आलेल्या संकटांचा विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. त्यामुळे गणेशोत्सवात मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही तिचे नाव निर्विघ्ना असे सुद्धा ठेवू शकता.

रिद्धिता

सिद्धिदा प्रमाणे तुम्ही मुलीचं नाव रिद्धिता सुद्धा ठेवू शकता. हे अतिशय युनीक नाव आहे. आपल्या मुलीचं नाव सर्वांपेक्षा वेगळं असावं असा विचार करत असाल तर हे नाव बेस्ट आहे.

अवनीशा

अवनीशा हे नाव महादेवाला स्मरुन घेण्यात आले आहे. तुम्ही लाडक्या चिमुकलीचं हे नाव ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT