Corona Virus saam tv
लाईफस्टाईल

Corona Virus: एक अज्ञात व्हायरल येईल आणि....! कोरोनाबाबत जपानच्या बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरणार खरी?

Corona Virus: बाबा वेंगाच्या आतापर्यंत अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. अशातच जपानचे बाबा वेंगा मानले जाणारे र्यो तात्सुकी यांनी कोरोनाबाबत भाकित केलं होतं. हे भाकित नेमकं काय होतं ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या रूग्णांचे वाढते आकडे पाहता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. अशातच आता एक जुनी भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आलीये . ही भविष्यवाणी जपानच्या प्रसिद्ध मंगा कलाकार र्यो तात्सुकी आणि 'जपानचे बाबा वेंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी जोडली गेलीये. असा दावा केला जातो की त्यांनी वर्षांपूर्वी कोविड-१९ सारख्या व्हायरस परत येण्याची भविष्यवाणी केली होती.

र्यो तात्सुकी यांनी १९९९ साली 'द फ्युचर अ‍ॅज आय सी इट' नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या स्वप्नांवर आधारित काही भाकितं केली. त्यांनी म्हटलं होतं की, २०२० मध्ये एक अज्ञात विषाणू येईल, जो एप्रिलमध्ये त्याच्या शिखरावर पोहोचेल आणि काही काळासाठी नाहीसा होईल. परंतु १० वर्षांनी तो पुन्हा परत येईल आणि अधिक विनाश करणार आहे.

दरम्यान या भाकि‍ताचा संबंध लोक कोरोना-१९ शी जोडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात पुन्हा एकदा कोरोना फोफावला आहे, आणि सध्याच्या प्रकरणांमध्ये वाढ ही त्या भाकिताचं लक्षण मानली जात आहे.

तात्सुकी यांच्या भाकि‍तामध्ये किती तथ्य?

तात्सुकी यांनी केवळ कोविड परत येणार याबाबत इशारा दिला नाही तर त्यांनी स्वप्नात २०२० ची पहिली लाट देखील पाहिली होती. असा दावा त्यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांनी म्हटलं होतं की, '२०२० मध्ये एक रहस्यमयी व्हायरस येणार आहे. आणि त्यानंतर २०३० मध्ये तो आणखी विनाशकारी स्वरूपात परत येण्याचा धोका आहे.

लोक या भविष्यवाणीला देखील बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांसारखे मानत असल्याचं पाहायला मिळतंय. बाबा वांगा हेच आहेत ज्यांनी कोविड-१९, राजकुमारी डायनाचा मृत्यू, फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि इतर अनेक घटनांची भाकीत केली होती. ही भाकितं खरी ठरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT