Baba Vanga saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी; 2025 मध्ये बदलून जाणार या राशींचं आयुष्य, होणार महत्त्वाचे बदल

Baba Vanga Predictions: बल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी 2025 साठी अनेक भविष्यवाणी केली आहेत. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी काही राशींबद्दल भाकीत केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा आता पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी जगाचा निरोप घेऊन जवळपास तीन दशकं झाली आहेत. मात्र तरीही तरी त्यांनी केलेली भाकितं आजही जगात चर्चेत असतात. बल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी 2025 साठी अनेक भविष्यवाणी केली आहेत.

विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी काही राशींबद्दल भाकीत केलं आहे. त्यांनी तीन राशींसाठी भविष्यवाणी केली आहे. ज्यांच्या जीवनात हा महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहे. या राशी आहेत मेष, वृषभ आणि मिथुन. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

२०२५ मध्ये मेष राशीचे लोक बदल आणि विलक्षण कामगिरीने भरलेल्या वर्षाची अपेक्षा करू शकतात. यावर्षी त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्नं पूर्ण होण्याची शक्यता आहे,असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं आहे. ज्या व्यक्ती स्वप्न पाहणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या स्वप्नांवर काम करणं कधीही थांबवू नये. इच्छित परिणाम मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी.

वृषभ

राशीचे लोक 2025 हे वर्ष सर्वात आनंदी आणि समृद्ध वर्षांपैकी एक असणार आहे. दीर्घकाळ आणि कठोर परिश्रमानंतर त्यांना शेवटी त्यांच्या श्रमाचे फळ मिळू शकणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते त्यांच्या फळाची वाट पाहत आहेत आणि आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. हुशारीने गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असू शकते.

मिथुन रास

वर्ष 2025 मध्ये मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाचे बदल आणि संधी मिळणार आहे. ते अडथळ्यांवर मात करणार आहेत. मोबदला मिळण्याची शक्यता असल्याने, मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांच्या विवेकाचे ऐकण्यासाठी आणि मोजलेली जोखीम घेण्याची ही उत्तम वेळ आहे. या वर्षी तुम्ही जास्तीत जास्त संधी मिळवू शकणार आहात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT