New Year 2023 saam Tv
लाईफस्टाईल

New Year 2023 : नवीन वर्षाच्या सुरुवातीला करा 'हे' 7 उपाय, वर्षभर टिकून राहिल धनसंपत्ती!

घरात मानसिक आणि आर्थिक समस्या येऊ नयेत, इत्यादी अनेक उपाय लोक नवीन वर्षात करतात.

कोमल दामुद्रे

New Year 2023 : उद्यापासून म्हणजेच रविवारपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. येणारे नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्षात घरात सुख-शांती नांदावी आणि नकारात्मक निघून जावी, घरात मानसिक आणि आर्थिक समस्या येऊ नयेत, इत्यादी अनेक उपाय लोक नवीन वर्षात करतात.

नवीन वर्षाची सुरुवात देवी-देवतांच्या पूजेने करावी, असेही मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून घेऊया, त्या उपायांबद्दल जे वर्षाच्या पहिल्या दिवशी केले पाहिजे ज्यामुळे घरात नेहमी धनदौलत टिकून राहिल.

1. सूर्यदेवाची उपासना करा

सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे हिंदू धर्मात सर्वात शुभ मानले जाते, म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्याला अर्घ्य अर्पण करणे सुरू करा. असे केल्याने वर्षभर घरात सुख-समृद्धी राहील आणि मान-सन्मानही वाढेल. आर्थिक समस्या दूर होतील. सूर्यदेवाच्या कृपेबरोबरच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होईल.

New Year 2023 upay

2. घरातील सुख-समृद्धी

तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे केशर ठेवा. त्यानंतर हे जल शिवलिंगावर अर्पण करावे. जल अर्पण करताना ओम महादेवाय नमः मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सर्व नकारात्मक ऊर्जाही संपुष्टात येते.

3. तुळशीची प्रतिष्ठापना करा

धार्मिकदृष्ट्या तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुळशीचे रोप नक्कीच घरी आणा रोज सकाळी तिला जल अर्पण करा असे केल्याने कुटुंबात सर्व काही मंगल होईल आणि सुख-समृद्धी सोबतच धनसंपत्ती वाढेल. यासोबतच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. यामुळे घर शुद्ध होते.

4. घराची स्वच्छता

वास्तुशास्त्रानुसार स्वच्छतेमुळे घरामध्ये शुभता येते. त्यामुळे नवीन वर्षात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. विशेषत: घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जिथून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह बनवा.

5. तुटलेल्या मूर्त्या नको

नवीन वर्षापूर्वी पूजा घराची साफसफाई करून तुटलेल्या मूर्ती काढून टाका. वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जा. गणेशजींना लाडू अर्पण केल्यानंतर प्रसादाचे वाटप गरिबांना करावे.

6. गायत्री मंत्राचा जप

चांगली नोकरी आणि प्रमोशन मिळण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गायत्री मंत्राचा दररोज 31 वेळा जप करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तसेच तुमच्या करिअरमध्येही चांगली वाढ होईल.

7. हनुमानाची पूजा करा

नवीन वर्षात पहिल्या दिवशी पवनसुत हनुमानजींच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्यानंतर चोळा अर्पण करा. ज्योतिषनुसार वर्षातून किमान दोनदा चोळाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT