Relationship Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्न करण्यापूर्वी होणाऱ्या पार्टनरला नक्की विचारा हे प्रश्न, आयुष्यभर टिकेल नातं !

Couples Tips : या दोन्ही व्यक्तींना आयुष्यभराचा सोबती म्हणून प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात सोबत राहावे लागते.

कोमल दामुद्रे

Must Ask these Questions To Your Partner : लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं नसतं तर ते दोन कुटुंबाला देखील जोडलं जातं. लग्नानंतर दोघांचे आयुष्य हे बदले जाते. या दोन्ही व्यक्तींना आयुष्यभराचा सोबती म्हणून प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात सोबत राहावे लागते.

लव मॅरेज असो किंवा अरेंज्ड मॅरेज आपण आपल्या पार्टनरच्या (Partner) आवडीनिवडी, नापसंती, सवयी देखील जाणून घ्यायला हव्या. लग्न करताना अनेकदा स्त्री व पुरुष दोघांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहातात.

त्यामुळे लोक स्वत:ला अनेक प्रश्न विचारतात, ज्यात त्यांचा जीवनसाथी कसा आहे, त्यांच्या आवडी-निवडी आणि त्यांच्यासोबत आयुष्य (Life) किती सोपे किंवा कठीण जाणार आहे. त्यासाठी लग्न करण्यापूर्वी जोडीदाराला आपण काही प्रश्न जरुर विचारायला हवे ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

1. लग्नाबाबत विचार

अरेंज्ड मॅरेज करताना हा सर्वात मोठा प्रश्न असतो की, काहीवेळेस घरच्यांच्या दबावाखाली काही निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी लग्न (Marriage) करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला तो लग्नासाठी तयार आहे की, नाही हे जरुर विचारा. तो कोणत्याही दबावाखाली लग्न करत नाही आहे ना हे देखील विचारा. तसेच लग्नाबाबत त्याचे विचार काय आहे हे जाणून घ्या

2. करिअर

लग्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या करिअरबद्दल विचारा. ज्याच्या सोबत तुम्ही वैवाहिक आयुष्य घालवण्याचा विचार करताय तो कोणत्या क्षेत्रात काम करतोय, त्याला कोणत्या विषयात जास्त रस आहे हे देखील विचारा. भविष्याबाबात त्याचे विचार कसे आहेत या गोष्टी देखील जाणून घ्या.

3. फॅमिली प्लानिंग

लग्नानंतर मुलगी आपले घर सोडून तिच्या सासरी राहायला येते. त्यासाठी आपल्या भावी जोडीदाराला फॅमिली प्लानिंगबद्दल देखील विचारायला हवे. कुटुंबाचे नियोजन त्यांची जबाबदारी कशी घ्यायची. होणारा खर्च याबाबत देखील चर्चा करायला हवी.

4. पूर्वीचे नाते

अनेकदा नात्यात दुरावा येण्याचे एक कारण जोडीदाराचे अफेर. लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल विचारा. जोडीदाराच्या मागील आयुष्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव नसावा, यासाठी दोघांनी एकमेकांना माजी व्यक्तीबद्दल विचारले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT