Itchy ears after bathing saam tv
लाईफस्टाईल

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Ear itching after shower: आंघोळीनंतर कानात खाज का येते? कानात पाणी साचणे, ओलावा, एक्झिमा, अ‍ॅलर्जी आणि संसर्ग यांमुळे हा त्रास होऊ शकतो. कानाची योग्य काळजी कशी घ्यावी, कॉटन बड्स का टाळावेत आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकांना आंघोळ केल्यानंतर कानात खाज येते किंवा कानात काहीतरी हालचाल होत असल्यासारखं वाटतं. बऱ्याचदा लोक ही एक साधी समस्या आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार कानात खाज येत असेल तर त्यामागे काही कारण असू शकतं. कानात पाणी साचणं, कानाच्या आतील त्वचेला त्रास होणं किंवा संसर्ग होणं यामुळे हा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आंघोळीनंतर कानात खाज का येते आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काय करावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आंघोळीनंतर कानात खाज का येते?

डॉक्टरांच्या मते, आंघोळीनंतर कानात खाज येणं ही सामान्य समस्या आहे. मात्र वारंवार असा त्रास होत असेल तर त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे.

आपल्या कानाच्या बाहेरील नलिकेच्या त्वचेवर एक नैसर्गिक संरक्षण थर असतो. तसंच कानात तयार होणारा मळही धूळ, पाणी आणि बाहेरून येणाऱ्या बारीक कणांपासून कानाचं संरक्षण करण्यास मदत करतो. मात्र वारंवार कानात पाणी गेल्यास किंवा कानात बराच वेळ ओलावा राहिल्यास त्वचेच्या या संरक्षण थराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कानात खाज येण्याची शक्यता वाढते.

२०२१ मध्ये International Journal of Otorhinolaryngology and Head and Neck Surgery या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कानाच्या नलिकेत पाणी साचणं आणि ओलावा टिकून राहणं यामुळे खाज येऊ शकते. अशा परिस्थितीत फंगल इन्फेक्शन होण्याचा किंवा कानाच्या बाहेरील भागाला सूज येण्याचा धोका वाढतो.

आंघोळ करताना कानात पाणी गेल्यामुळे आधीपासून असलेला मळ फुगू शकतो. तसंच कान वारंवार स्वच्छ केल्याने त्यातील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो. यामुळे कानाच्या आतील त्वचेला कोरडेपणा जाणवू शकतो आणि खाज येऊ शकते.

कानात ओलावा राहिल्यास संसर्ग होण्याचा धोका

डॉक्टर सांगतात की, कानात सतत ओलावा राहिल्यास कानाच्या बाहेरील नलिकेत बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढण्याची शक्यता असते. यामुळे होणाऱ्या संसर्गाला 'ओटायटिस एक्सटर्ना' असं म्हणतात. यालाच 'स्विमर्स इअर' असंही म्हटलं जातं. या संसर्गाची सुरुवात अनेकदा कानात खाज येण्यापासून होते. सुरुवातीला हा त्रास साधा वाटू शकतो. मात्र संसर्ग वाढल्यास कान दुखणं, कानाच्या आतील भागात लालसरपणा येणं, सूज येणं, कानातून द्रव बाहेर पडणं आणि ऐकण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

कानात खाज येण्यामागील कारणं

आंघोळीनंतर कानात खाज येण्यामागे केवळ पाणी साचणं किंवा संसर्ग हीच कारणं नसतात. इतर काही कारणांमुळेही हा त्रास होऊ शकतो.

एक्झिमा

एक्झिमा हा त्वचेशी संबंधित त्रास आहे. यामुळे कानाच्या त्वचेला खाज येऊ शकते. काही वेळा त्वचा कोरडी होणे आणि तिच्यावर जळजळ होणे अशी लक्षणेही दिसतात.

त्वचेची अ‍ॅलर्जी

काही पदार्थांमुळे कानाला अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामुळे कानाच्या त्वचेला खाज येण्याची शक्यता असते.

कानातील मळ कमी होणं

कानातील मळ हा कानाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा असतो. तो खूप कमी झाल्यास कानाच्या आतील त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडून खाज येऊ शकते.

इअरफोन आणि इअरबड्सचा वापर

सतत इअरफोन किंवा इअरबड्स वापरल्याने कानाच्या त्वचेला घर्षण होऊ शकते. काही लोकांमध्ये यामुळे त्वचेला त्रास होऊन खाज येऊ शकते.

कान स्वच्छ करताना कोणती काळजी घ्यावी?

कानात खाज आल्यावर अनेक जण कॉटन बड्स, बोट किंवा एखादी टोकदार वस्तू कानात घालून खाज कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र असं करणं टाळलं पाहिजे. कानात वस्तू घातल्याने कानाच्या नाजूक त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे जळजळ वाढू शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. कानातील मळ काढण्याच्या प्रयत्नात तो आणखी आत ढकलला जाण्याची शक्यता असते.

आंघोळीनंतर कानाची काळजी कशी घ्यावी?

आंघोळीनंतर कानाची योग्य काळजी घेतल्यास ओलाव्यामुळे होणारा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते.

  • कानाचा बाहेरील भाग कोरडा करा

  • डोके एका बाजूला झुकवा

  • कानात वस्तू घालू नका

  • वारंवार खाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

SCROLL FOR NEXT