तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारणे हा एक हृदयस्पर्शी आणि खास क्षण असतो, पण जर तुम्ही पहिल्यांदाच असे करत असाल, तर थोडा संकोच वाटू शकतो, हे स्वाभाविक आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच मुलीला मिठी मारत असाल, तेव्हा आत्मविश्वास आवश्यक आहे. व्हॅलेंटाइन आठवड्यातील हग डे हा दिवस लोक त्यांच्या प्रिय व्यक्तींना मिठी देण्यासाठी साजरा करतात. जर तुम्हालाही तुमच्या क्रशसोबत किंवा नव्याने बनलेल्या प्रेयसीसोबत हा दिवस साजरा करायचा असेल, तर तिच्या भावनांचा आदर करा आणि परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद द्या. या टिप्समुळे तुमच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय होईल.
परिस्थिती समजून घ्या आणि योग्य वेळ निवडा
- मुलीच्या भावनांना समजून घेण्यासाठी तिच्या आजूबाजूचे वातावरण आणि तिची शारीरिक भाषा काळजीपूर्वक लक्षात घ्या.
- योग्य वेळ निवडा, जसे मुलगी आनंदी असेल, भावनिक मूडमध्ये असेल, किंवा निरोप-स्वागतासाठी योग्य क्षण असेल.
- जर व्यक्ती अस्वस्थ वाटत असेल किंवा मिठी मारण्याच्या मूडमध्ये नसेल तर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करु नका.
आधी मुलीची परवानगी घ्या
- जर तुम्हाला मुलगी आरामदायी आहे का याची खात्री नसल्यास, किंवा ती गोंधळात आहे असे वाटल्यास हलक्या मनाने तिची परवानगी घ्या.
- मी तुला मिठी मारू शकतो का? असे विचारत तुमचे हात पुढे करा आणि चेहऱ्यावर हलकी अशी स्माईल ठेवा जेणेकरून ती निर्णय घेऊ शकेल.
- जर ती आनंदाने हो म्हणाली किंवा स्वतःहून पुढे आली, तर तुम्ही तिला मिठी मारायला पुढे जाऊ शकता.
मिठी मारण्याचे योग्य टिप्स
- पहिल्यांदाच मुलीला मिठी मारताना ती सौम्य आणि हळूवार ठेवा, पहिली मिठी एकदम घट्ट मारु नका.
- खांद्यावर किंवा कंबरेवर हलकेच हात ठेवा, यामुळे मिठी अधिक प्रेमळ आणि आरामदायी वाटेल.
- मिठी फार वेळ मारु नका. २-४ सेकंदांची मिठी पुरेशी आणि परिपूर्ण मानली जाते.
- मैत्रीपूर्ण मिठीसाठी पाठीवर हलकासा स्पर्श किंवा थोपटणे हा योग्य आणि सहज मार्ग आहे.
- मुलीला अस्वस्थ वाटू नये म्हणून मिठी सौम्य ठेवा, शांत राहा आणि वेळेचा अतिरेक टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.