काही लोकांशी बोलल्याने मन प्रसन्न होते, एक वेगळीच शांतता मिळते, तर काही लोकांशी थोड्या वेळासाठीही बोलल्याने डोकेदुखी होते. ऑफिसमध्ये (Office) तुम्हाला अशी अनेक माणसं भेटली असतील, पण तुम्हाला त्यांच्याशी इच्छा नसूनही बोलावे लागते. यासाठी तुमच्यावर होणाऱ्या बळजबरी किंवा डोकेदुखी याावर उपचार जाणून घ्या. परंतू असे लोक ओव्हर फ्रेंडली प्रकारात येतात.
ओव्हर फ्रेंडली लोकांचे वैशिष्ट्य
इतरांना कंफर्टेबल वाटण्यासाठी मैत्रीपूर्ण स्वभाव खूप महत्वाचा आहे, परंतु ओव्हर फ्रेंडली असणारा स्वभाव तुम्हाला अस्वस्थ करू शकतो. असे लोक केवळ स्वतःबद्दल अतिशयोक्ती करत नाहीत तर इतरांच्या आयुष्यात (Life) खूप रस घेतात. यामुळे अनेक वेळा अशा लोकांशी बोलणे किंवा काहीतरी शेअर करणे नंतर तुमच्यासाठी अडचणीचे ठरते. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील तर त्यांच्याशी कसे वागायचे ते जाणून घ्या.
सीमा सेट करा
तुम्ही ओव्हर फ्रेंडली लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही, त्याऐवजी तुमची मर्यादा निश्चित करा. जर त्यांनी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे समजावून सांगा की, हे योग्य नाही आणि तुम्हाला ते आवडत नाही. तुम्ही नाही म्हणाल तर वाईट वाटेल याची काळजी करू नका.
व्यस्त आहात असे दाखवा
जर तुम्ही अशा लोकांना सरळ शब्दात उत्तर देऊ शकत नसाल तर त्यांच्यापासून डिस्कनेक्ट करण्याचा दुसरा सुरक्षित मार्ग म्हणजे स्वतःला व्यस्त दाखवणे. समोर येताच काही कामाचे बहाणे करून निघून जा. तुमची वृत्ती पुन्हा पुन्हा बघून तुम्हाला बोलण्यात रस नाही हे त्यांना आपोआप समजेल.
प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ नका
एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रतिक्रिया मिळते तेव्हाच संभाषण पुढे नेता येते, म्हणून ओव्हर फ्रेंडली लोकांशी डील करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे ते जे काही बोलतात त्यास प्रतिसाद न देणे. हे असभ्य वर्तन आहे असे समजू नका. अशा लोकांशी डील करण्यासाठी ही योग्य वागणूक आहे.
कमी बोला
ओव्हर फ्रेंडली लोक तुम्हाला त्यांच्या चर्चेत इतके अडकवतात की तुम्ही अशा गोष्टी शेअर करता ज्या तुम्ही करायला नको. त्यामुळे अशा लोकांशी शक्य तितके फक्त होय किंवा नाही या शब्दात बोला. त्यांना टाळण्याचा हा छोटासा मार्ग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.