Almonds Side effects
Almonds Side effects Saam Tv
लाईफस्टाईल

Almonds Side effects : कडू बदाम खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Almond Side Effects And Benefits : बदाममध्ये हजारो पोषकतत्व उपलब्ध असतात. त्यामुळे बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शरीरात ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तीक्ष्ण बुद्धी होण्यासाठी भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला बहुतेक लोक देतात.

मात्र तुम्ही कधी कडू बदाम खाल्ले आहेत का? सामन्यात: बदामाची चव गोड आणि खमंग असते, पण कडू बदाम असेल तर त्याची चव खूप खराब असते. त्यामुळे कडू बदाम निघाला तर तो गिळायचा की थुंकायचा जाणून घ्या.

1. बदाम कडू आहेत हे कसे समजेल?

बदामला सर्वात शक्तिशाली ड्रायफ्रूट्स समजले जाते. कारण बदामामध्ये हेल्दी फॅट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फायबर ,प्रथिने ,व्हिटॅमिन (Vitamins) ई या पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण असते. अनेक बदामापैकी काही असे असतात जे कडू निघतात. या बदामाचे रंग आकार सामान्य बदामासारखाच असतो, त्यामुळे त्यांना बघून कडूपणा ओळखता येत नाही. म्हणून बदामाची चव खाल्ल्यानंतरच कळते बदाम कडू आहे की चांगले आहे.

2. कडू बदाम खाणे सुरक्षित आहे का?

खरेतर कडू बदामाचे पौष्टिक मूल्य नेहमीच्या बदामासारखे असते मग ते कडू का असतात? कडू असलेल्या बदामामध्ये amygdalin चे प्रमाण असते. जे शरीरासाठी हानिकारक आहे. कडू बदाम खाल्ल्याने शरीरात सायनाइड तयार होऊ शकते. म्हणून कडू बदाम खाल्याने तुमचा जीवही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर कधी तुम्ही चुकून कडू बदाम खाल्ला तर लगेच थुंकून टाका.

3. रिसर्च काय सांगते ?

2011 मध्ये क्लिनिकल टॉक्सीलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, कडू बदाम खाल्ल्याने शरीरात सायनाइड तयार होण्याची शक्यता असते. १० लोकांच्या ग्रुपवर संशोधन करण्यात आले. त्यानुसार ज्यांनी कडू बदाम खाल्ले, त्यांना मळमळ, उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी आणि कन्फ्युजन यासारखी लक्षणे (Symptoms) उद्भवली. ज्याने सिद्ध केले की कडू बदाम शरीरात विष निर्माण करू शकते.

4. बदामचे किती प्रकार आहेत?

भारतामध्ये (India) वेगवेगळ्या प्रकारचे बदाम आढळतात. बदाम आकार आणि रंगात भिन्न असू शकतात. त्यांची चव जवळपास सारखीच असते. बदामामधील सर्वात लोकप्रिय बदाम म्हणजे कॅलिफोर्निया, शालिमार, गरबंदी, प्रणयाज ,मखदूम ममरा, कागदी हे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT