Shubh Muhurat April 2026 google
लाईफस्टाईल

Shubh Muhurat April 2026: लवकरच संपणार खरमास, सुरु होणार लग्नाची धामधूम, वाचा एप्रिल महिन्यातल्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण यादी

Shubha Wedding Dates 2026: एप्रिल 2026 मध्ये खरमास संपल्यानंतर विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. अक्षय तृतीया विशेष दिवस असून या काळात लग्नासाठी अनुकूल ग्रहस्थिती राहणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

एप्रिल मे महिना हा काळ लग्नाच्या धामधुमीचा मानला जातो. या दिवसांमध्ये शुभ कार्य केली जातात. आनंदाची बातमी म्हणजे एप्रिल 2026 हा महिना शुभ कार्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि चांगला असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला या कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात. पण हा वेळ संपला की, तुम्हाला याचा सगळ्यात जास्त लाभ होईल.

सूर्य मीन राशीत असताना हा काळ अपवित्र मानला जातो. पण 14 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करताच खरमास संपेल आणि 15 एप्रिलपासून पुन्हा सर्व शुभकार्यांना सुरुवात होणार आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नासाठी अनेक चांगले मुहूर्त असणार आहेत. 15 एप्रिल रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रात दुपारी 3:22 ते रात्री 10:31 पर्यंतचा काळ शुभ मानला जात आहे. 20 एप्रिलला रोहिणी नक्षत्रात पहाटे 4:35 ते 7:28 पर्यंत विवाहासाठी अनुकूल वेळ आहे. 21 एप्रिलला मृगशिरा नक्षत्रात पहाटे 4:15 ते 5:52 हा मुहूर्त चांगला मानला जाणार आहे. 25 एप्रिललाही लग्नासाठी चांगली परिस्थिती राहणार आहे.

26 एप्रिल रोजी मघा नक्षत्रात सकाळी 5:47 ते रात्री 8:27 पर्यंत मोठा आणि शुभ कालावधी असेल. 27 एप्रिलला उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रात्री 9:18 ते 9:35 हा लहान पण शुभ मुहूर्त आहे. 28 एप्रिल रोजी दिवसभर सकारात्मक नक्षत्रांचा प्रभाव राहणार आहे. 29 एप्रिलला हस्त नक्षत्रात सकाळी 5:59 ते सायंकाळी 7:52 हा वेळ शुभ कार्यासाठी उत्तम मानला असणार आहे.

या महिन्यातला सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया, जी 19 एप्रिल 2026 रोजी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा अबूझ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेल्या कार्यांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असं मानलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT