Tea Business Saam Tv
लाईफस्टाईल

Tea Business : तुमच्या ऑफिस बाहेरचा चहावाला अंदाजे किती पैसे कमवत आहे? वाचा सविस्तर

आळस दूर करायचा असेल, झोप दूर करायची असेल किंवा उर्जेने भरून ताजेतवाने व्हायचे असेल, तर चहाची जोड नाही.

कोमल दामुद्रे

Tea Business : सकाळी लवकर उठल्याबरोबर प्रत्येकाला ज्या गोष्टीची तीव्र इच्छा जाणवू लागते, ती म्हणजे चहा. आळस दूर करायचा असेल, झोप दूर करायची असेल किंवा उर्जेने भरून ताजेतवाने व्हायचे असेल, तर चहाची जोड नाही.

फक्त सकाळ आणि संध्याकाळचा चहा तुम्हाला रोमँटिसिझमने भरतो आणि पाहुणचारात फक्त चहा दिला तरी परंपरा पाळली जाते. पाहुणचार करून पाहुणे खूश होतात. काहींसाठी ते व्यसनासारखे बनते.

दिवसातून अनेकवेळा चहाचा घोट घेतला नाही तर आयुष्यच व्यर्थ वाटते. आजच्या धावपळीच्या जगात जिथे अर्ध्याहून अधिक आयुष्य घराबाहेरच्या कामात घालवले जाते, तिथे या चहाच्या व्यसनाला न्याय कसा मिळणार?

अनेकदा काम करताना पुन्हा नव्याने ऊर्जा मिळावी यासाठी आपण टपरीवरचा चहा पितो. कटिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चहाची किंमत अवघे १० रुपयांपर्यंत असते. परंतु, तुम्हाला माहित आहे का ? तुमच्या ऑफिस बाहेरचा चहावाला अंदाजे किती पैसे कमावत असेल. यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते जाणून घेऊया

1. चहाचे दुकान उघडण्यासाठी काय आवश्यक असते?

चहाचे दुकान उघडण्यासाठी तर सर्वप्रथम योग्य जागा, रस्ता किंवा दुकान भाड्याने घ्यावे लागेल, स्वस्त पण चांगल्या दर्जाचा कच्चा माल घ्यावा लागेल, गुंतवणूक आणि कमाईशी संबंधित सर्व संभाव्य माहिती गोळा करावी लागेल.

2. चहाच्या व्यवसायात किती पैसे (Money) मिळतात?

चहाच्या व्यवसायातून नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास, दुकानदारांच्या मते, तुम्हाला 50% पर्यंत नफा मिळतो, जर तुम्ही दररोज 1000 कमावले तर सुमारे 500 रुपये नफा होऊ शकतो. परंतु यासाठी एकूण गुंतवणूक म्हणून सुमारे 20 ते 25 हजार रुपयेही लागतात

3. 1 लिटर दुधात (Milk) किती चहा बनवता येतो?

1 लिटर दुधात तुम्ही 14 ते 16 कप चहा बनवू शकता. परंतु, तुमचा चहा प्रसिद्ध व्हावा यासाठी दुकानाचे नाव, चहाची चव देखील महत्त्वाची आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Smartphone Care: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

SCROLL FOR NEXT