Annakut recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Annakut Recipe : गोवधर्न पूजेत ठेवला जातो अन्नकूटचा प्रसाद, जाणून घ्या त्याची चवदार रेसिपी

या दिवशी अन्नकूटाचा प्रसाद बनवून श्रीकृष्णाला अर्पण केला जातो.

कोमल दामुद्रे

Annakut Recipe : हिंदू धर्मात गोवर्धन पूजेला खूप महत्त्व आहे. यंदा हा सण २६ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण निसर्ग आणि माणसाबद्दलच्या आदराचे उत्तम उदाहरण आहे. या दिवशी अन्नकूटाचा प्रसाद बनवून श्रीकृष्णाला अर्पण केला जातो. गोवर्धनाच्या दिवशी श्री कृष्णाची पूजा केली जाते आणि गोवर्धन पर्वताची कथा ऐकली जाते. जाणून घेऊया अन्नकूटाचा प्रसाद कसा बनवला जातो. (Latest Marathi News)

अन्नकूट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटा (Potatoes), वांगी, फ्लॉवर, बीन्स, सांगरी, गाजर, मुळा, गोल करील, आर्बी, भिंडी, परवळ, लौकी, शिमला मिरची, कच्ची केळी (Banana), भोपळा, पालक या सर्व भाज्याचा वापर यात केला जातो.

मसाले

आले, हिरवी मिरची, हिरवी मेथी, तेल, हिंग, जिरे, हळद, धने पावडर, तिखट, आमचूर पावडर, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर

कृती -

  • हे करण्यासाठी, सर्व भाज्या स्वच्छ करून त्या मध्यम आकारात कापून घ्या.

  • धुतलेल्या भाज्या गाळून घ्या. आणि मुळ्याची पाने बारीक चिरून घ्या.

  • टोमॅटो धुवून त्याचे लहान तुकडे करा. मिरच्याही चिरून घ्या.

  • आले सोलून, धुवून किसून घ्या. त्याच वेळी, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.

  • कढईत तेल गरम करा. गरम तेलात हिंग आणि जिरे टाका. जिरे भाजल्यानंतर त्यात हळद, धणेपूड घालून थोडा वेळ परतून घ्या. आता हिरवी मिरची, आले घालून मसाले हलके परतून घ्या.

  • आता सर्व चिरलेल्या भाज्या पॅनमध्ये ठेवा. तसेच बटाटे, वांगी आणि कच्ची केळी कापून टाका. मीठ आणि लाल तिखट घालून सर्व भाज्या एकत्र करा.

  • त्यात साधारण १ वाटी पाणी टाका आणि नंतर पॅन झाकून ठेवा आणि भाजीला उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजवा.

  • करी एक उकळी आल्यानंतरमंद आचेवर शिजवा आणि 15 ते 20 मिनिटांनी तपासा.

  • भाज्या मऊ झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. भाजीत गरम मसाला, आमचूर पावडर आणि हिरवी धणे घालून गॅस बंद करा.चविष्ट अन्नकूट तयार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT