Chikhloli Dam Saam TV
लाईफस्टाईल

Chikhloli Dam : मनाला विसावा देणारं चिखलोली डॅमचं अद्भुत सौंदर्य; VIDEO पाहाल तर स्वत:ही भारावून जाल

Ambernath Tourist Places in Rainy Season : आज आम्ही तुम्हाला अंबरनाथमधील चिखलोली डॅमबाबत माहिती सांगणार आहोत. अंबरनाथकरांना विरंगुळा म्हणून जाण्यासाठी ठरलेलं ठिकाण म्हणजे चिखलोली डॅम.

Ruchika Jadhav

पावसाळा सुरु असताना अनेक पर्यटक प्रेमींना धबधबा किंवा डॅमला भेट देण्याचा मोह होतो. येथे आल्यावर सर्वजण मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करतात. अशात आज आम्ही तुम्हाला अंबरनाथमधील चिखलोली डॅमबाबत माहिती सांगणार आहोत. अंबरनाथकरांना विरंगुळा म्हणून जाण्यासाठी ठरलेलं ठिकाण म्हणजे चिखलोली डॅम.

गर्द झाडीतून पायवाट

चिखलोली डॅम चिखलोली या गावात आहे. या गावातील नागरिकांसह बदलापूर, अंबरनाथ आणि विविध आसपासच्या शहरांमधील व्यक्ती येथे फिरण्यासाठी येत असतात. डॅमपर्यंत पोहचण्याआधी येथे गर्द दाट झाडीतून एक छोटीशी पायवाट जाते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या ठिकाणी भेट देताना प्रवासातच मन अगदी प्रसन्न होतं.

कसं जायचं?

कल्याण ते चिखोली डॅम सुमारे १५.५ किमी अंतरावर आहे. येथे येण्यासाठी कल्याण – बदलापूर मार्गे प्रवास करावा लागेल. जर तुम्ही ठाण्याहून येत असाल तर ठाणे ते चिखोली धरण ३४.३ किमी अंतरावर आहे. बाय रोड तुम्ही थेट खाजगी वाहनाने येथे पोहचू शकता.

ट्रेनने प्रवास

जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर चिखलोली धरण गाठण्यासाठी तुम्हाला लोकल ट्रेनने बदलापूर किंवा अंबरनाथ या रेल्वे स्थानकांवर उतरावे लागेल. त्यानंतर पुढे तुम्ही रिक्षा किंवा प्रायव्हेट वाहनाने या डॅमपर्यंत पोहचू शकता.

सुट्टीसाठी उत्तम ठिकाण

जर तुम्हाला तुमची सुट्टी मजेशीर आणि आनंदात घालवायची असेल तर या ठिकाणी नक्कीच भेट देता येईल. तुम्ही येथे राहण्याचा देखील प्लान करू शकता. त्यासाठी चिखलोली या गावात किंवा बदलापूर तसेच अंबरनाथ परिसरात अनेक सुंदर फार्म हाऊस आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता.

काळजी घेणे आवश्यक

चिखलोली डॅम परिसरात अनेक अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे येथे आलेल्या प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांसह तु्म्ही या ठिकाणी फरण्यासाठी आलात तर त्यांना एकटे सोडू नका. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT