Bhujangasana Benefits
Bhujangasana Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Bhujangasana Benefits : भुजंगासन करण्याचे जबरदस्त फायदे, या समस्यांपासून मिळेल आराम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhujangasana Benefits For Health : आजच्या युगात अनेक व्यक्ती खूप कमी वयामध्ये विविध प्रकारच्या आजारांना बळी पडले आहेत. काळजीचे कारण म्हणजे, हजार व्यक्तींना वाढत्या वयामध्ये होत होते ते आजार या युगातील कमी वयाच्या व्यक्तींना होत असल्याचं पाहायला मिळतय. या समस्या शारीरिक निष्क्रियतेमुळे होतात.

अशा प्रकारच्या समस्यांपासून वाचण्यासाठी नियमितरीच्या व्यायाम केला पाहिजे. त्याचबरोबर नियमित योगासन (Yoga) केल्याने तुमचे मस्तिष्क आणि मन चांगले राहण्यासाठी मदत होते. योगा केल्याने शरीरामधील सगळ्या अंगांना योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन (Oxygen) पोहोचते. यासाठी तुम्हाला भुजंगासन करायला हवे.

भुजंगआसनाला कोब्रा पोज देखील म्हटले जाते. दररोज कोब्रा पोज केल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त होऊ शकता. सोबतच शरीरामध्ये नवीन स्फूर्तीचा संचार होईल.

भुजंगाआसन करण्याची पद्धत -

1. हे असं करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर झोपून घ्या.

2. आता तुमच्या दोन्ही हातांना जमिनीवर खांद्याच्या अंतरापासून वेगळे करा.

3. शरीराच्या खालील भागास जमिनीवर ठेवून श्वास घ्या.

4. या दरम्यान छातीला जमिनीपासून उचलत वरच्या बाजुस बघा.

5. त्यानंतर श्वास सोडून तुमच्या शरीराला पुन्हा जमिनीवर आणा.

भुजंगासन करण्याचे फायदे -

तणाव आणि डिप्रेशनपासून सुटकारा -

हे आसन केल्याने ताणतणाव आणि डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना फायदा होतो. मानसिक स्वास्थ्याला जोडलेल्या सगळ्या समस्यांपासून सुटकारा मिळण्यासाठी भुजंगासन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

थायरॉईडच्या समस्येसाठी फायदेशीर -

कोब्रा पोज गळा आणि थायरॉईडच्या ग्रंथीला उत्तेजित करण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना थायरॉईडची समस्या असेल त्यांनी नियमितपने भुजंगासन केल्याने त्यांना भरपूर मदत मिळेल. भुजंगासन हार्मोन स्त्रावला संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे थायरॉईड आणि जटिलता कमी केली जाऊ शकते.

गाठींच्या समस्येपासून सुटकारा -

पूर्वी वाढतावयासोबत व्यक्तींमध्ये गाठीची समस्या पाहायला मिळायची. परंतु आता अगदी कमी वयामध्ये अनेक व्यक्तींमध्ये गाठीची समस्या पाहायला मिळते. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी तुम्ही भुजंगासन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे असं केल्याने तुमच्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या होऊन सुरळीतपणे काम करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT