जिओ आणि एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. अशातच एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीनर रिचार्जची ऑफर आणली आहे. ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉल्सची ऑफर मिळत आहे.
या रिचार्ज प्लानमध्ये 5G डेटाचा लाभही मिळत आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये यूर्जसना फ्री रोमिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार आहे. एअरटेलने असाच एक प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. जो ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना दररोज फक्त 8 रुपयांपेक्षा (Price) कमी खर्च करावा लागेल. जाणून घेऊया या पॅकची खासियत
1. एअरटेलचा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलचा हा प्रीपेड प्लान ६६६ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्सची (Calls) ऑफर (Offer) मिळत आहे. जो देशभरात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. हा प्लान फ्री नॅशनल रोमिंगसह येतो. याशिवाय या प्लानमध्ये दिवसाला १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा मिळत आहे.
जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तो 5G नेटवर्कमध्ये असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकता. यासाठी युजर्सना Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्क निवडावा लागेल. या प्रीपेड प्लानमध्ये फ्री Hello Tunes आणि Wynk Music चा लाभ घेता येईल.
2. इन- फ्लाइट पॅक
एअरटेलने नुकताच इन-फ्लाइट प्लान लॉन्च केला आहे. या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सना फ्लाइटमध्ये इंटरनेट, कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ घेता येईल. एअरटेलच्या १९५ रुपयांच्या या प्लानमध्ये 250MB डेटासह 100 मिनिटे आउटगोइंग कॉल आणि 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळणार आहे. त्याच वेळी, 295 रुपयांच्या प्लानमध्ये 500MB डेटाचा लाभ मिळेल आणि 595 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 1GB डेटाचा लाभ मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.