Air Pollution Effects On Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution Effects On Skin : प्रदूषणामुळे त्वचा पडू शकते काळी, होऊ शकते नुकसान; कशी घ्याल काळजी

Air Pollution Effects : वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने त्वचेवर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

Shraddha Thik

Skin Effected By Air Pollution :

वायू प्रदूषण हे हवेतील कण आणि वायूंचे एक मिश्रण आहे. वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने त्वचेवर हानिकारक परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात. गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे त्वचेवर (Skin) मोठा परिणाम झाला आहे. डॉ. दीप्ती राणा, वरिष्ठ सल्लागार, त्वचाविज्ञान, मॅक्स मल्टी स्पेशालिटी सेंटर यांनी वायुप्रदूषणाच्या इतर दुष्परिणामांबद्दल देखील सांगितले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्वचेचे नुकसान करते

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्समधील असंतुलन होणे. फ्री रॅडिकल्स हे ऑक्सिजन असलेले रेणू असतात ज्यात असमान इलेक्ट्रॉन असतात. या प्रदूषकांच्या उच्च पातळीच्या दीर्घकाळ किंवा वारंवार संपर्कामुळे त्वचेवर गंभीर नकारात्मक परिणाम (Effects) होऊ शकतात. डॉ. राणा स्पष्ट करतात की, वायू प्रदूषण हे अत्यंत प्रतिक्रियाशील रेणू जे त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. ज्यामुळे त्वचेची लवचिकता, त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या आणि त्वचा निस्तेज होते.

प्रदूषणामुळे त्वचेची जळजळ होते

PM2.5 आणि VOCs सारखे प्रदूषक त्वचेमध्ये दाहक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. लालसरपणा, खाज सुटणे आणि सूज यासारख्या त्वचेच्या अनेक स्थितींमध्ये जळजळ हा एक सामान्य घटक आहे. प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने त्वचारोगासारख्या रोगांना बळी पडण्याची समस्या (Problem) वाढते. आणि त्यामुळे त्वचेची जळजळ होते.

त्वचा डिहाइड्रेट होते

बदलत्या वातावरणात सतत वायू प्रदूषण होते आणि त्यामुळे शरीरात पाण्याचे कमतरता जाणवते. तसेच याकारणांनी त्वचेचे डिहाइड्रेटन होते आणि त्वचेचे नुकसान बऱ्याच प्रमाणात वाढते. डिहाइड्रेटनमुळे त्वचेची नॅच्यूरल ब्युटी कमी होते आणि त्वचा कोरडी होते. डिहाइड्रेटनमुळे त्वचा अनेकदा निस्तेज आणि निर्जीव दिसते.

प्रदूषणामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो

वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने त्वचेच्या कर्करोगाची समस्या वाढत चालली आहे. प्रदूषण त्वचेच्या पेशींमध्ये डीएनएच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा विकास होऊ लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT