Lassa fever saam tv
लाईफस्टाईल

Lassa fever: कोरोनानंतर लासा फीवर घालतोय थैमान, एकाचा मृत्यू; पाहा काय आहेत या फीवरची लक्षणं!

Lassa fever: वेस्ट आफ्रिकेमध्ये लासा फीवरची अनेक प्रकरणं समोर आली आहे. या फीवरची नेमकी लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

कोरोनानंतर आता अजून एक समस्या डोकं वर काढताना दिसतेय. वेस्ट आफ्रिकेमध्ये लासा फीवरची अनेक प्रकरणं समोर आली आहे. मुख्य म्हणजे यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. या फीवरमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला आयोवा शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा हेल्थ केअर मेडिकल सेंटरमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. या फीवरची नेमकी लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

काय आहे लासा फीवर?

लासा फीवर हा लसा व्हायरसमुळे होणारा रक्तस्रावी रोग आहे. हे मास्टोमायस नॅटलेन्सिस नावाच्या उंदरामुळे पसरतो. हे उंदीर पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार, लासा फीवर हा व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो. हा विषाणूजन्य रोग बेनिन, घाना, गिनी, लायबेरिया, माली, सिएरा लिओन, टोगो आणि नायजेरियामध्ये स्थानिक मानला जातो.

ही समस्या इतर पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये देखील आहे. एकंदरीत पाहिलं तर याचा एकूण प्रजनन दर एक टक्के आहे. लासा तापाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण 15% आहे. या आजाराला नायजेरियाचं नाव देण्यात आलंय.

लासा फीवरमध्ये काय लक्षणं दिसून येतात?

हा फीवर अशक्तपणा आणि अस्वस्थता या लक्षणांनी सुरू होतो. यावेळी रूग्णाला काही दिवसांनंतर डोकेदुखी, घसा खवखवणं, स्नायू दुखणं, छातीत दुखणं, मळमळ, उलट्या, खोकला आणि पोटदुखी ही अजून लक्षणं दिसून येतात. इतकंच नाही तर यावेळी गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तींना चेहऱ्यावर सूज येणं, फुफ्फुसांमध्ये द्रव पदार्थ साठणं, तोंड, नाक, योनी या मार्गातून रक्तस्राव होणं अशा तक्रारीही जाणवतात.

या रोगाचा उष्मायन कालावधी जवळपास 6 ते 21 दिवसांचा असतो. या समस्येची लागण झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांनंतर याची लक्षणं दिसून येतात. गंभीर किंवा जीवाला धोका असलेल्या प्रकरणांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर 14 दिवसांच्या मृत्यू होण्याचा धोका संभवतो. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात हा रोग विशेषतः गंभीर असतो. तिसऱ्या तिमाहीत 80% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये माता मृत्यू आणि/किंवा गर्भाला धोका असल्याचं मानलं जातं.

लासा फीवरवर कसे केले जातात उपचार?

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, सध्यातरी या फीवरवर कोणतेही उपचार नाहीयेत. मात्र येत्या काळात यावर उपचार विकसीत केले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT