बेडरुम सोडून 'वायग्रा'चे इतर फायदेही तुम्हाला करतील आश्चर्यचकित; जाणून घ्या Saam TV
लाईफस्टाईल

बेडरुम सोडून 'वायग्रा'चे इतर फायदेही तुम्हाला करतील आश्चर्यचकित; जाणून घ्या

वायाग्राची गोळी (Viagra) ही सहसा लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी वापरली जाते.

वृत्तसंस्था

वायाग्राची गोळी (Viagra) ही सहसा लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी वापरली जाते. परंतु काही लोकांना हे माहित आहे का की हृदयाशी संबंधित अनेक रोगांवर वायग्रा उपचार करू शकते. सुरुवातीच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ते 90 सेकंदांच्या आत हृदयाच्या समस्या वायग्रा रोखू शकते. एवढेच नाही तर ते हृदयाच्या स्नायू पेशींमध्ये कॅल्शियमची असामान्य वाढ कमी करते. स्वीडनच्या कॅरोलिस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, ज्या पुरुषांना कोरोनरी धमनीशी संबंधीत रोग आहे. त्यांनी जर वायाग्रा घेतली तर त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. बेडरुम सोडून वायग्राचे काय फायदे आहेत? ते जाणून घेवूयात

* कार्डियाक एरिथमिया बहुतेकदा हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगामुळे होतो. वायाग्रा अशा पेशींना दाबून धरते ज्यामुळे शरीरात कॅल्शियम वाढते. या व्यतिरिक्त, हृदयाची गती नियंत्रित करते.

* मँचेस्टर विद्यापीठातील व्याख्यानात डॉ. डेव्हिड हचिंग्स म्हणाले वायग्रा संबंधीत हा अभ्यास फक्त हृदयरोगशा निगडीत गोष्टींशी काम करत नाही तर हृदसरोगाशी संबंधीत आजार जेथून सुरु होतो त्या जागेलाही नियंत्रीत करते.

* त्यांनी सांगितले वर्ष 2016 मध्ये, शुगर असलेल्या रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की वायग्राचा वापर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

* ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे सहयोगी वैद्यकीय संचालक प्रोफेसर मतीन अवकीरन म्हणाले की, यावर अधिक संशोधनाची गरज आहे. तथापि, भविष्यात वायग्राबाबत अधिक शक्यता आहेत.

* जेव्हा वायग्राची क्लिनिकल ट्रायल करण्यात आली, तेव्हा अतिशय मनोरंजक दुष्परिणाम उघड झाले. यामुळे पुरुषांच्या शरीरात वेगवेगळे परिणाम जाणवले. आणि आता वायग्राचे दुष्परिणामही तेच आहेत.

* अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांनी वायग्राचा वापर केला आहे, त्यांनी दावा केला आहे की ते घेतल्यानंतर त्यांना बहिरेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, अनेकांनी सांगितले की, हे औषध वापरल्यानंतर, त्यांना गेल्या पाच वर्षांत आणखी अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT