एक दिवा महाराजांसाठी; सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सचा किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव रोहिदास गाडगे
लाईफस्टाईल

एक दिवा महाराजांसाठी; सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सचा किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव

सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सने दीपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा केला.

रोहिदास गाडगे

पुणे: सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सने दीपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा केला. यासोबत आकर्षक रांगोळी, पुष्पहार, तोरण व दिवे लावून दीप प्रज्वलनाचे महत्व सांगण्यात आले. विशेष म्हणजे एक दिवा शहाजी महाराजांसाठी, एक दिवा जिजाऊंसाठी, एक दिवा शिवाजी महाराजांसाठी, एक दिवा शेतकऱ्यांसाठी, एक दिवा वीर जवानांसाठी असे विविध १० संदेश यावेळी देण्यात आले. (A lamp for the maharaja; see the Dipotsav of Sahyadri Wildlife Trekkers at Shivneri Fort)

हे देखील पहा -

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुर्गपूजन मोठ्या उत्स्फूर्तपणे केल्यानंतर, दिवाळीचे औचित्य साधून हर-हर महादेवाची घोषणा ऐकून धीर देणाऱ्या व परकीय आक्रमक थोपवून धरणाऱ्या सह्याद्रीच्या मजबूत गड-किल्ल्यावर सालाबादप्रमाणे याहीवर्षी हजारो दिवे लावून शिवरायांच्या जन्मस्थळ असलेल्या आणि मराठा साम्राज्याची साक्ष देणाऱ्या बालेकिल्ला असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे दीपोत्सव पार पाडण्यात आला.

एक दिवा महाराजांसाठी; सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सचा किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव

भारताच्या प्राचीन परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि 'विविधतेमध्ये एकता' हे आपले राष्ट्रीय मूल्य कायम जपण्यासाठी तरुणांना प्रोत्साहीत करण्याचा हेतू लक्षात घेऊन, समाजातील विविध सामाजिक विभागणी पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य भारताच्या बहुविध संस्कृतीत आहे. हीच संस्कृती जपण्याचा 'सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्स' जुन्नर तालुक्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग इव्हेंट सोबतच संस्कृती पूरक कार्यक्रम घेऊन करत आहे.

या कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले, त्यात शिवरायांचे गुणगाण गाणारे पोवाडे सादर करण्यात आले. या कार्यक्रमास वनविभागाचे वनपाल विधाटे भाऊसाहेब व सहकारी उपस्थित होते. संपूर्ण सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्स टीमने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी अनिकेत डुकरे, योगेश कोकणे, देवा भालचीम, शेखर शिंदे, अंकिता शिंदे, शौर्य शिंदे, सायली ढोबळे, आरती घोगरे, हर्षदा ढोले, दिगंबर शिंदे, श्रद्धा बटवाल, लहु गंभिरे, आकाश पोफळे यांनी नियोजन केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT