Senior Citizen Pension Saam Tv
लाईफस्टाईल

Senior Citizen Pension : वयोवृद्धांना दरमाह घरबसल्या मिळणार 4500 रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

Pension Scheme : केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना सुरू करत असते. या योजनांच्या मदतीने देशातील नागरिकांना लाभ मिळू शकतो.

कोमल दामुद्रे

How to apply for pension scheme : केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना सुरू करत असते. या योजनांच्या मदतीने देशातील नागरिकांना लाभ मिळू शकतो. भारतातील काही राज्यांमध्ये वृद्धपकाळ योजना सुरु करण्यात आली आहे.

त्यातील उत्तर प्रदेशात सध्या वृद्धापकाळ पेन्शन (Pension) योजना सुरू करण्यात आली आहे. आज आपण वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना काय आहे आणि त्यासाठी तुम्ही अर्ज (Application) कसा करू शकता हे जाणून घेऊया

1. वृद्धापकाळ पेन्शन योजना काय आहे?

जर तुमच्या कुटुंबात (Family) ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्या खर्चासाठी तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून योगदान देतात.

वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेची आर्थिक मदत देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

2. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे.

  • पहिल्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपर्यंत असावे.

  • या व्यतिरिक्त, जर तुम्ही या योजनेत ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकत असाल तर त्यांचे वय देखील 65 वर्षांपर्यंत असावे.

  • वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा अर्जदार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

3. कोणाला घेता येईल लाभ ?

जर अर्जदाराच्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी 20 वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल परंतु तो देखील दारिद्र्यरेषेखालील असेल तसेच अर्जदाराला देखील या योजनेचा लाभ मिळेल.

4. अर्ज कसा करायचा?

  • वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • ओल्ड एज पेन्शन स्कीम वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

  • आता येथे तुम्हाला 'Apply Online' चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.

  • यापैकी, 'न्यू एंट्री फॉर्म' या पर्यायावर टॅप करा.

  • यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, त्यामध्ये तुमची सर्व माहिती भरा आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून सेव्ह करा.

  • यानंतर तुम्हाला या योजनेतून दरमहा ४५०० रुपयांची आर्थिक मदत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT