Cashew nut
Cashew nut  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीयांनी खाल्ले ३ लाख टन काजू, सणासुदीला वाढेल अधिक भाव!

कोमल दामुद्रे

मुंबई : कोरोना (Corona) महामारी दरम्यान प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व आरोग्याबाबत आपण अधिक जागृत होत गेलो. त्यात आपण अनेक प्रकारचे काढे, फळे व सुका मेव्याचे सेवन केले. या महामारीनंतर काजूच्या उत्पादनात त्याचा वापर दीडपटीने वाढला आहे.

हे देखील पहा -

मनीकंट्रोलच्या मते, काजू आणि कोको विकास संचालनालयाने सांगितले आहे की, देशातील काजूचा वाढता वापर पाहता उत्पादक निर्यात करण्याऐवजी देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे. सध्या देशात काजूचा वर्षभराचा वापर हा ३ लाख टन झाला असून कोरोनापूर्वी तो २ लाख टन होता. ब्रँडेड काजूच्या विक्रीतही वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

६० टक्के वापर हा आयातीद्वारे भागवला -

काजूचे उत्पादन हे देशातील वापराच्या तुलनेत वाढत नाही. अशा वेळी त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. ६० टक्के काजूचा वापर हा आयातीतून केला जातो. २०२१-२२ मध्ये भारताने (India) ७.५ लाख टनकाजूचे उत्पादन केले, तर या कालावधीत कच्च्या काजूची आयात ९.३९ लाख टन केली होती. मात्र सध्या त्याचा वाढणारा खप पाहता लवकरच ही आयात दहा लाख टनांच्या पुढे जाईल. देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमताही १८ लाख टनांवर पोहोचली आहे, जी वर्षभरापूर्वी १.५ दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर वैयक्तिक वापर फक्त १० ते १५ टक्के आहे.

काजूचे दर सप्टेंबरपासून वाढतील -

काजूच्या मागणीच्या दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतरचा काळ हा सणासुदीचा असतो त्यात त्याचे भाव वाढू शकतील. सध्या ९५०-१२०० रुपये किलोने ते बाजारात विकले जात आहे. तर प्रीमियम काजू हे ७००-८५० या दराने विकले जात आहे. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही ५५० ते ६५० रुपये किलोपर्यंत आहे. उत्पादनांना आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काजूच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

काजूच्या निर्यातीत ५० टक्के घट -

महामारीनंतर काजूचा देशांतर्गत वापर वाढला पण निर्यात ही अधिक कमी होत आहे. याचे कारण व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत, भारत दरवर्षी १,००,००० टन काजू निर्यात करत असे, तर २०२१-२२ मध्ये ५१,९०८ टनांवर आले आहे. याउलट व्हिएतनाममध्ये स्थानिक वापर कमी झाला असून निर्यातीत वाढ होत आहे. व्हिएतनाम हा सध्या जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदर देश समजला जात आहे. सध्या तेथून दर महिन्याला होणारी काजूची निर्यात आता वर्षभरात भारतात होत आहे.

निर्यातीत घट होण्याची दोन कारणे -

यामध्ये दोन कारणांमुळे झपाट्याने घट होत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. अर्थात पहिला देशांतर्गत खप वाढल्याने बाहेरून माल पाठवण्याची फारशी गरज भासली नाही. तसेच देशांतर्गत बाजारात २० फूट कंटेनर विकले तर सुमारे १५ टन काजू येतात व त्याचे साधारण ५ ते ८ लाख रुपये मिळतात. त्याच वेळी त्यावर १० टक्के शुल्क लागू केल्यामुळे कच्च्या काजूची आयात महाग झाली आहे, तर निर्यातीवर मिळणारा दर आता ६ टक्क्यांवरून २.१५ टक्क्यांवर आले आहे. अशा परिस्थितीत भारतीय काजू जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक राहिले नाही. जागतिक बाजारपेठेत काजूची किंमत प्रति पौंड $३.५० आहे, तर व्हिएतनाममध्ये काजूची किंमत प्रति पौंड $२.८ इतकी आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

SCROLL FOR NEXT