Free Smartphone For Women Saam Tv
लाईफस्टाईल

Free Smartphone For Women: 1.35 कोटी महिलांना मिळणार मोफत स्मार्टफोन; जाणून घ्या, कसे ?

१.३५ कोटी महिलांना लवकरच मोफत स्मार्टफोन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

कोमल दामुद्रे

Free Smartphone For Women : महिलांसाठी प्रत्येक सरकार काहींना काही करत असते. त्यातच आता पुन्हा एकदा नवीन बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारला १७ डिसेंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या योजना आणि उपलब्धी लोकांपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. याबाबत शहरी व ग्रामीण भागात विविध ठिकाणी प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. यामध्ये, गेहलोत सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक मानली जाणारी मोफत स्मार्टफोन योजना देखील सुरू केली जाऊ शकते. म्हणजेच राजस्थानमधील १.३५ कोटी महिलांना लवकरच मोफत स्मार्टफोन (Smartphone) मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

सरकारशी संबंधित सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 18 डिसेंबर रोजी राहुल गांधी दौसा येथील सिकंदरा येथून योजनेची सुरुवात करू शकतात. यापूर्वी ही योजना नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार होती, मात्र भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसमधील राजकीय वादामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ही योजना सुरू करू शकतात. याशिवाय ते माहिती जनसंपर्क विभागाचे अॅप लॉन्च करणार आहेत. सरकारच्या कामाच्या आणि उपलब्धींच्या पुस्तिकाही जारी करू शकतात. आता आपण गेहलोतच्या या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

1. स्मार्टफोन कसा असेल ?

  • गेहलोत सरकारने राजस्थानमधील १.३५ कोटी महिलांना मोफत स्मार्टफोन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सरकारने 12 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

  • महिलांना दिले जाणारे स्मार्टफोन नोकिया, सॅमसंग आणि जिओ कंपन्यांचे असू शकतील.

  • एका फोनची किंमत सुमारे नऊ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • मोबाईल फोनची खासियत म्हणजे त्यामध्ये सरकारी सिम आधीच अॅक्टिव्हेट असेल.

  • ज्यामध्ये तीन वर्षांसाठी मोफत इंटरनेट आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा असेल.

  • या मोबाईलमध्ये दुसरे सिम चालणार नाही. त्याचा स्लॉट आधीच बंद होईल. या स्मार्टफोन्सची किंमत (Price) जवळपास 9 हजार रुपये आहे.

2. कोणत्या महिलांना मिळेल स्मार्टफोन?

  • जनआधार कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत मोबाईल फोन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  • राज्यात अशा महिलांची संख्या १.३५ कोटी आहे, मात्र चिरंजीवी योजनेत नाव जोडलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत स्मार्टफोन योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मूळची राजस्थानची असणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल क्रमांकही आधार कार्डशी लिंक करावा.

3. मोबाईल फोनचे वितरण कसे केले जाईल?

  • सरकारने महिलांना स्मार्टफोन वितरित करण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे.

  • मोबाईल वितरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

  • मोबाईल वाटपासाठी बचत गटातील महिलांचीही मदत घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले होते.

  • याशिवाय, BSLL, Jio आणि Airtel चे कर्मचारी देखील मोबाईल वितरण शिबिरांमध्ये तैनात केले जातील, जे महिला लाभार्थींना मोबाईलसह सिम सक्रिय करतील आणि जागेवरच कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करतील.

  • महिला लाभार्थ्यांना मोबाईल वितरण शिबिरात आणण्यासाठी बचत गटांशी संबंधित महिला काम करतील.

  • त्यांना सरकारी योजनांसाठी मोबाईल वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • यासोबतच मोबाईलमध्ये असलेल्या सरकारी अॅप्सचा वापर कसा करायचा हेही ती सांगणार आहे.

4. आपण मोबाइलसह काय करू शकत नाही?

  • या मोबाईल्सचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त सरकारने दिलेले सिमच काम करेल. यामध्ये इतर कोणतेही सिम वापरता येणार नाही.

  • केवळ महिला लाभार्थी किंवा तिचे कुटुंब असे स्मार्टफोन वापरू शकतील. या स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.

5. योजना किती काळ चालणार?

  • गेहलोत सरकारची मोफत स्मार्टफोन योजना तीन वर्षांसाठी चालणार आहे.

  • सरकारने राज्यातील १.३५ कोटी महिलांना मोबाईल देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 12 हजार कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.

  • चालू आर्थिक वर्षासाठी 3500 कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.

  • स्मार्टफोन पुरविणाऱ्या कंपन्यांनाही तीन वर्षांत हप्त्यांमध्ये पैसे दिले जातील.

  • निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना स्मार्टफोन वाटप करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT