म्यानमारच्या जंगलात एका झाडाच्या राळेत मध्ये १० कोटी वर्षांपूर्वीच्या खेकड्याचे जीवाश्म सापडले आहे. या शोधामुळे वैज्ञानिक अतिशय उत्साहित असून, एखाद्या ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे ही माहिती कुतुहल निर्माण करणारी ठरली आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी तसेच यूनान, रेजिना, लिन, ड्यूक, येल आणि चायना युनिव्हर्सिटी मधील ८ संशोधकांचा या संशोधनात सहभाग आहे.
हे देखील पहा-
झाडाच्या राळेत किंवा डिंकात प्राचीन काळामधील जीव अडकून पडून ते तसेच टिकून राहतात. या पारदर्शक आणि घट्ट राळेला 'अम्बर' असे म्हटले जात आहे. आता अशाच राळेत अडकलेल्या आग्नेय आशिया मधील जंगलातील खेकड्यावरून अनेक गोष्टी आढळून आले आहेत. १० कोटी वर्षांनंतर देखील या खेकड्याचे वंशज अद्याप तसेच दिसत आहेत. हेही यामधून समजले जात आहे.
सागरी जीवांच्या विकासाबाबत या शोधामुळे नवे संशोधन होऊ शकतील. हे जीव जगात कसे विस्तारले याचाही यामुळे अभ्यास केला जात आहे. केवळ ५ मिलीमीटर आकाराचा हा खेकडा एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आहे. अशा राळेत आतापर्यंत केवळ कीटकच आढळून आले आहेत.
डायनासोरच्या काळातील या जीवाचा आता अनेक बाबतीत संशोधनासाठी उपयोग होणार आहे. या खेकड्याचे डोळे, तोंड वगैरे अनेक अवयव अद्यापही सुरक्षित आहेत. हा खेकडा 'क्राऊन यूब्राच्युरा' किंवा 'ट्रू क्रॅब्स' म्हणून ओळखला जातो. हे खेकडे घरटी बनवून राहत असतात. सध्याच्या ब्राच्युरन प्रजातीच्या खेकड्यांचा हा जवळचा नातेवाईक, पूर्वज आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.