Debit Card Stuck in ATM google
Image Story

ATM Alert: ATMमध्ये डेबिट कार्ड अडकल्यानंतर घाबरू नका; फक्त ६ महत्वाची कामे लगेच करा

Debit Card Safety Tips: एटीएममध्ये डेबिट कार्ड अडकल्यावर घाबरून जाऊ नका. कार्ड जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही पुढील सोप्या स्टेप्स करा. त्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक बॅंकेत जाण्यापेक्षा एटीएमने पैसे काढणं पसंत करतात. कारण ही प्रोसेस फक्त काही सेंकदाची असते. पण बऱ्याचवेळेस व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सुद्धा डेबिट कार्ड मशीनमध्ये अडकते. अशा वेळी घाबरून गोंधळून न जाता योग्य काम केलं पाहिजे.

Debit Card Stuck in ATM

एटीएममध्ये कार्ड का अडकतं?

ATM मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये कधीकधी बिघाड, इंटरनेट कनेक्शन खंडित झाल्यामुळे किंवा अचानक वीज जाणं यामुळे कार्ड मशीनमध्ये अडकू शकतं. तसेच तुम्ही सतत चुकीचा पिन टाकल्यात असाल तरीही कार्ड अडकू शकतं.

Debit Card Stuck in ATM

कार्ड अडकल्यानंतर घाबरून जाऊ नका

कार्ड अडकल्यावर काही लोक घाईगडबडीत चुकीची कृती करतात. तेव्हा तुम्ही कार्ड स्लॉटमध्ये बोट, पिन किंवा कोणतीही टोकदार वस्तू घालू नका. असं केल्यावर कार्ड तुटू शकतं किंवा मशीनचं नुकसान होऊ शकते.

Banking Security Tips

बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा

सर्वात आधी कार्ड अडकल्यावर बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करा. एटीएमचं ठिकाण, वेळ आणि मशीनवरील ATM ID क्रमांकाची माहिती अधिकाऱ्यांना सांगा. यामुळे तक्रारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल.

Banking Security Tips

डेबिट कार्ड लगेच ब्लॉक करा

सुरक्षेच्या दृष्टीने कार्ड लगेचच ब्लॉक (Hotlist) करणं खूप गरजेचं आहे. मोबाईल बँकिंग अॅप किंवा कस्टमर केअरच्या मदतीने कार्ड बंद केल्यावर त्याचा गैरवापर होण्याचा धोका पूर्णपणे टळू शकतो.

Debit Card Stuck in ATM? Follow These 6 Important Steps Immediately

नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध

बऱ्याचदा बँका या अडकलेले कार्ड कायमचं रद्द करून नवीन डेबिट कार्ड देण्याचा ऑप्शन देतात. जवळपास 7 ते 10 कामकाजाच्या दिवसांत नवीन कार्ड ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवलं जातं. त्यामुळे खातं सुद्धा सुरक्षित राहतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमधील बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण आठ दिवसापासून उपाशी

Kalyan : गस्तीवेळी संशयास्पद हालचाल दिसली; थांबवण्याचा प्रयत्न करताच दोघांनी पळ काढला नंतर... कल्याण पोलिसांची मोठी कारवाई

किडनी फेल होण्यापूर्वी कंबरेत दिसतात 'हे' 5 बदल; वेळीच ओळखले नाही तर...

Kangana Ranaut: कंगना रणौत यांनी खरंच गुपचूप लग्न केलं? स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत सगळंच सांगितलं

Dark Neck Skin: मानेभोवती काळपटपणा साचलाय? दुर्लक्ष नको, ‘या’ गंभीर आजारांचं असू शकतं सुरुवातीचं लक्षण

SCROLL FOR NEXT