Personal Hygiene Tips SAAM TV
Image Story

Personal Hygiene Tips : सगळं कुटुंब आंघोळीसाठी एकच साबण वापरतं? वाचा काय नुकसान होईल

Health care : सर्व कुटुंबाने आंघोळीसाठी एकच साबण वापरणे आरोग्यासाठी घातक ठरते.

Shreya Maskar
Importance of bathing

आंघोळीचे महत्त्व

रोजच्या धावपळीतून शरीराला स्वच्छ करण्यासाठी आंघोळ खूप महत्त्वाची आहे. चांगल्या साबणाने आंघोळ केल्याने धूळ, माती, बॅक्टेरिया निघून जातात.

Choose soap according to skin type

स्किन टाईपनुसार साबण निवडा

खरतरं चांगल्या आरोग्यासाठी आपल्या स्किन टाईपनुसार साबण वापरणे योग्य ठरते. पण सर्वसामान्यांच्या घरात अनेक वेळा एकच साबण कुटुंबातील सर्व व्यक्ती आंघोळीसाठी वापरतात. जे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे.

Bacterial risk

बॅक्टेरियांचा धोका

एकच साबण अनेकांनी वापरल्यावर त्यावर बॅक्टेरिया तयार होतात. जे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे.

Risk of skin infection

त्वचेला संसर्ग होण्याचा धोका

एका रिसर्चनुसार, साबणाच्या वडीवर वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू आणि बॅक्टेरिया असतात. साबणावरील बॅक्टेरियामुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच त्वचा लाल होते.

Be careful when using soap

साबण वापरताना घ्या काळजी

सर्वसामान्यांना वेगवेगळा साबण घेणे जमत नसले तरी, ती लोक साबण वापरताना 'या' गोष्टींची काळजी घेऊ शकतात.

soap

साबण स्वच्छ धुवा

एकच साबण कुटुंबातील सर्व सदस्य वापरत असाल तर स्वतःच्या आंघोळीपूर्वी साबण स्वच्छ धुवा. जेणेकरून साबणावर जंतू राहणार नाहीत.

Soap foam

साबणाचा फेस

साबण थेट त्वचेवर लावण्यापेक्षा त्याचा फेस त्वचेवर चोळा. असे करणे जास्त फायदेशीर राहील.

Dry the soap

साबण कोरडा करा

प्रत्येकाने साबण वापरून झाल्यावर तो संपूर्ण कोरडा करा. कारण ओल्या साबणावर जंतू वाढण्याची शक्यता असते.

Keep the soap dish clean

साबणाचे भांडे स्वच्छ ठेवा

साबण ठेवणाऱ्या डबीची देखील नियमित स्वच्छता ठेवा. तसेच ती कोरडी करा.

Use of liquid soap

लिक्विड सोपचा वापर

उत्तम पर्याय म्हणजे साबणापेक्षा बॉडी वॉश किंवा लिक्विड सोपचा वापर करा. यामुळे शरीराला संसर्ग होणार नाही.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT