Winter Skin Care Tips SAAM TV
Image Story

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात आठवड्यातून एकदा 'या' पदार्थांनी चेहरा धुवा, मिळेल ग्लोइंग त्वचा

Skin Care Tips: हिवाळ्यात विशेषता त्वचेची काळजी घ्या. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे फेसवॉशसोबत 'या' पदार्थांनीही चेहरा स्वच्छ करा.

Shreya Maskar
Skin care in winter

हिवाळ्यात त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून चेहरा फेसवॉशने स्वच्छ केल्या‌‌वर तो मॉइश्चराइजर करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

Face wash

फेसवॉशचा वापर

मात्र हिवाळ्यात फक्त फेसवॉशने चेहरा न धुवता बेसन पीठ, मध आणि टोमॅटोचा रस या पदार्थांनी देखील चेहरा धुवा.

Hydrate skin

हायड्रेट त्वचा

बेसन पीठ, मध आणि टोमॅटोचा रस हे पदार्थ त्वचा हायड्रेट ठेवण्यास आणि चेहरा चमकवण्यासाठी मदत करतात.

Gram flour

बेसनचा वापर

एका बाऊलमध्ये बेसन, गुलाब पाणी आणि दही मिसळून त्याची पेस्ट बनवून १५-२० मिनिटे लावून ठेवा. काही दिवसात चेहरा उजळू लागेल.

Honey

मधाचा वापर

मधातील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. आठवड्यातून एकदा १५ ते ३० मिनिटांसाठी मध चेहऱ्याला लावून ठेवा.

Dark spots on the face

चेहऱ्यावरील काळे डाग

मधामुळे चेहरा मऊ होतो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. पिंपल्स देखील दूर होतात. मध तुमची त्वचा हेल्दी ठेवते.

Tomato juice

टोमॅटोचा रस

काळवंडलेल्या चेहऱ्याला चमक आणण्याचे काम टोमॅटोचा रस करते. तसेच टोमॅटोमुळे कोरडी त्वचा हायड्रेट होते आणि नैसर्गिक ग्लो येतो.

Cold tomato

थंड टोमॅटो

तुम्ही टोमॅटोचा रस काढून चेहऱ्याला लावू शकता किंवा टोमॅटो त्वचेवर चोळू शकता. मात्र थंड टोमॅटो कधीच चेहऱ्यावर लावू नये.

Milk

दुधाची साय

आठवड्यातून एकदा दुधाची साय लावून चेहरा स्वच्छ करावा. दुधाची साय गरम नसली पाहिजे याची काळजी घ्या. दुधामधील गुणधर्म चेहरा स्वच्छ करून हायड्रेट ठेवतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT