team india celebration twitter
Image Story

Team India Celebration: नरेंद्र मोदींसोबत ब्रेकफास्ट, मुंबईत ग्रँड रोड शो! असं आहे टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचं शेड्युल

Team India Celebration Schedule: भारतीय संघ गुरुवारी भारतात दाखल होणार आहे. दरम्यान भारतात आल्यानंतर कसं असेल सेलिब्रेशनचं शेड्युल? जाणून घ्या.

Ankush Dhavre
team india

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. यासह दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे.

hardik pandya

वर्ल्डकप जिंकल्यानंतर २ जुलै रोजी भारतीय संघ मायदेशात दाखल होणार होता. मात्र बारबाडोसमधील चक्रीवादळामुळे खेळाडूंना भारतात येण्यास उशीर झाला.

team india

बुधवारी एअर इंडियाचं विमान बारबाडोसमध्ये दाखल झालं आहे. भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदस्य, खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य आणि पत्रकार वर्ल्डकप ट्रॉफीसह मायदेशात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

team india

भारतीय संघातील खेळाडू भारतात आल्यानंतर जोरदार जल्लोष केला जाणार आहे. गुरुवारी सकाळी हे विमान दिल्लीत लँड होणार आहे.

rohit sharma with narendra modi

दिल्लीत लँड झाल्यानंतर भारतीय खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ब्रेकफास्ट करणार आहेत.

hardik pandya

नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहेत .

team india

मुंबईत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाची विजयी रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅळी संध्याकाळी ४ वाजता, मुंबईतील नरीमन पॉईंटपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात येणार आहे.

team india

वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर जय शहांच्या हस्ते बीसीसीआयने जाहीर केलेलं १२५ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT