आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा जमला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.
मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळाला. पंढरपुरात आज विठू नामाचा गजर घुमत आहे. Ashadhi Wari 2024
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरपुरमध्ये दाखल झालेत. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असल्याचं पाहायला मिळतंय.
दरवर्षीप्रमाणे आजही पंढरपुरामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी दाखल झालेत. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
अवघे पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने दुमदुमून गेलंय. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झाल्याचं दिसत आहे.
पंढरपुरात वैष्णवांचा आनंद सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
आषाढी एकादशीनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे देखील विठुचरणी नतमस्तक झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासमवेत पंढरपुरात आज विठठ्ल-रूक्मिणीचं दर्शन घेतलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.