मार्गशीषचा पहिला महिना महिलांसाठी खूप शुभ मानला जातो. त्या उपवास, पुजा, घराची सजावट या सगळ्या गोष्टी या महिन्यात करतात.
मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारी कलश स्थापन करून लक्ष्मीची पूजा केली जाते. रांगोळी काढली जाते. या सगळ्यात महिल्यात महिलांची खूप धावपळ होते. याचाच वितार करून ५ मिनिटात रांगोळी कोणती काढायची ही टिप आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुख्य दारवर तुम्ही कलशच्या आकाराची रांगोळी काढून त्यावर धाण्यानी सजावट करू शकता. ही सगळ्यात सोपी रांगोळी आहे.
तुम्ही बारिक नक्षी काढत नसाल तर देवीचा मुखवटा काढू शकता. त्याआधी तुम्ही खडूने संपुर्ण चित्र काढा.
सगळ्यात सोप्पी रांगोळी म्हणजे लक्ष्मीची पावले. ही रांगोळी तुम्ही कमी रंगात आणि कमी वेळेत काढू शकता.
सोपी रांगोळी काढायची असेल तर एक कलश काढा आणि त्यावर तुम्ही कोणताही दागिना ठेवा.
तुम्हाला जर देवीचा कलश काढता येत असेल तर तुम्ही त्याच्या बाजूने वेगवेगळ्या रंगाचे लहान ठिपके काढू शकता.
दिवे लावणार असाल तर कलश काढा. मग महिरप काढा आणि बाजूने दिवे लावा ही सगळ्यात सुंदर रांगोळी असू शकते.
तुम्हाला कलश येत नसेल तर तुम्ही एका पट्टीच्या आकारात एक रंग टाका आणि त्यावर शुभ लक्ष्मी लिहा.