तेल, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, बारीक कांदा, बारीक गाजर, मशरूम, सिमला मिरची, कोबी, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, शेझवान सॉस, व्हिनेगर, बासमती तांदूळ, तळलेले नूडल्स, कांदयाची पात.
रात्रीच्या डिनरमध्ये गार्लिक मशरूम राइस बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा आणि मंद आचेवर तेल गरम करून घ्या.
त्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण टाका आणि सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
लसून चांगला परतल्यानंतर त्यामद्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले टाकून परत एकदा परतून घ्या
त्यानंतर त्यामध्ये सर्व बारिक चिरलेल्या भाज्या टाकून गॅस फास्ट करून दोन ते तीन मिनिटे भाज्या चांगला तेलामध्ये परतून घ्या.
भाज्या तेलामध्ये चांगले परतल्यानंतर त्यामद्ये चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, शेझवान सॉस, व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र मिक्स करून घ्या.
त्यानंतर उकडलेला बासमती तांदूळ टाकून सर्व साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये वरून कांद्याची पात आणि तळलेले नूडल्स टाका.
अशाप्रकारे तुमचा गार्लिक मशरूम राइस तयार. तुम्ही हा मशरूम राइस सॉस सोबत सर्व्ह करू शकता आणि तुमच्या कुटुंबासोबत डिनरची मजा घेऊ शकता.
Edited By: Nirmiti Rasal