maharashtra farmer europe tour Saam tv
Image Story

शेळी पालन ते ऊस उत्पादन, महाराष्ट्रातील ५५ प्रगतीशील शेतकऱ्यांची युरोप टूर; काय काय अभ्यास करणार?

maharashtra farmer europe tour : शेळी पालन ते ऊस उत्पादनाच्या अभ्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी युरोप दौऱ्यावर करण्यात आला आहे.

Vishal Gangurde
Maharashtra farmers

फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शिवरायांची 396 वी जयंती साजरी केली. सातासमुद्रपार छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका आहे. राज्यातील 55 शेतकरी शेतीविषयक अभ्यासासाठी युरोप दौऱ्यावर आहेत. 15 दिवसांचा हा दौरा आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Europe study tour

शेतकरी कोणता अभ्यास करणार ?

युरोपातील देशांमधील कृषी विषयक तंत्रज्ञानाची माहिती घेतली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बकरी पालन आणि त्यावर चीज प्रक्रिया याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याशिवाय उसाचे चिपाट आणि कचरा यापासून मिथेन गॅस निर्मिती प्रकल्पांची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली जाणार आहे.

शेळी पालन

अतिरिक्त ऊस आणि त्याच्या वेस्टेजचा म्हणजेच टाकाऊ गोष्टींचा कसा वापर करता येईल, याचा अभ्यास महाराष्ट्रातील शेतकरी करणार आहेत. मॉडर्न वायनरी यार्ड आणि प्रक्रिया युनिट शेतकऱ्यांनी पाहिलं आहे. Paris agriculture visit

Paris agriculture visit

या सगळ्या अभ्यासाचा, निरीक्षणाचा महाराष्ट्रात उपयोग व्हावा तसेच चांगल्या बाबींची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यात करावी हा उद्देश या दौऱ्यामागचा आहे, अशी माहीती दौऱ्यात सहभागी झालेले शहापुरचे बबन हारणे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना दिली. राज्यातील प्रगतीशील शेतक-यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT