बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस मोठ्या अडचणीत आली आहे.
२०० कोटी रूपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी जॅकलिनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
सुकेश चंद्रशेखर २०० कोटी रूपयांच्या फसवणूकीत चौकशी दरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले.
रॅनबॅक्सी या औषध कंपनीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींना २०० कोटी रूपयांच्या फसवणूक केल्याचा हा आरोप आहे.
यामध्ये ईडीने केलेल्या चौकशीमध्ये, सुकशच्या संपर्कात जॅकलिन असल्याचं समोर आलं. त्याने महागड्या भेटवस्तू जॅकलिनचा दिल्या आहेत.
याचदरम्यान जॅकलिन ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित होती. जॅकलिनने याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने जॅकलिनची याचिका फेटाळली आहे. यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.