Heavy Rainमहाराष्ट्रासह प्रत्येक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहेत.
Health Problemगडचिरोली जिल्ह्यातही पावसाळात आरोग्याची समस्या भीषण झालेली आहे याचे भयान वास्तव पुन्हा एकदा पाहावयास मिळाले आहे.
3 kmसध्या गडचिरोली जिल्ह्यात गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागली आहे.
20 kmगडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून साधारण २० किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोली येथील गरदोर महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे.
As there is no roadसुरुवातीस या महिलेला चरविदंड येथे नेण्यात आले होते मात्र रस्ता नसल्याने तिला पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला.
Health and road issuesगडचिरोलीमध्ये झालेल्या या प्रकारामुळे या जिल्ह्यातील आरोग्य आणि रस्ते प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलेला आहे.
Many questionसध्या गडचिरोलीमधील घडलेल्या या घटनेमुळे अनेक संतप्त प्रश्न उपस्थित केले जात आहेत.